अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- गेल्या दीड वर्षाहून अधिक काळापासून देशात कोरोनाने कहर केला आहे. यामध्ये अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. यातच सिनेमा क्षेत्रातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे,
ती म्हणजे दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान कमल हासन काही दिवसांपूर्वी अमेरिकेचा दौरा करुन भारतात परतले होते.
यावेळी त्यांना सौम्य खोकला येत असल्याने त्यांनी कोरोना टेस्ट केली. या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोरोना झाल्य़ाचे स्पष्ट झाले आहे.
सध्या कमल हासन आयसोलेशनमध्ये असून सोशल मीडियाद्वारे त्यांनी ही माहिती शेअर केली आहे. विशेष म्हणजे कमल हासन यांचे लसीकरण पूर्ण झाले असतानाही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
ट्वीटमध्य़े म्हंटले… अमेरिकेच्या दौऱ्यावरून परत असताना मला थोडा खोकला जाणवू लागला, त्यामुळे मी कोरोनाची चाचणी केली.
या चाचणीत मला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. यावरून कोरोना महामारी अद्याप संपली नसल्याचे समोर आलेय. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्या असं त्यांनी म्हटले आहे.