Ajab Gajab News : भारतातील ह्या गावात देशाचे संविधान मानले जात नाही…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ajab Gajab News : भारतात असे एक गाव आहे की, जिथे देशाचे संविधान मानले जात नाही. मलाणा असे या गावाचे नाव. हिमाचल प्रदेशातल्या कुलू जिल्ह्यातील हे हशीशसाठी तर प्रसिध्द आहेच, या शिवाय लोकशाहीच्या स्थापनेसाठीही याच गावाचे नाव घेतले जाते.

सर्वात प्राचीन लोकशाहीची बीजे याच गावात रोवली गेली. सुरुवातीला काही नियम बनले. त्याचे रुपांतर नंतर संसदीय प्रणीत बदलण्यात आले. या गावात स्वतःची संसद आहे. लोकसभा, राज्यसभेप्रमाणे छोटे आणि मोठे सभागृह गावात आहे.

मोठ्या सदनात एकूण ११ सदस्य आहेत. त्यातले आठ ग्रामस्थ निवडतात. पंतप्रधान आणि पुजारी या सभागृहाचे स्थायी सदस्य असतात. गावातल्या प्रत्येक घरातला एकजण सभागृहात सदस्य असतो. वरच्या सभागृहात कुणाचे निधन झाल्यास सभागृहाचे गठन पुन्हा केले जाते.

गावाचे स्वतःचे प्रशासन आणि कायदा सुव्यवस्था आहे. ग्रामस्थ जमलू ऋषींना देवता मानतात. एखाद्या किचकट प्रकरणाचा फैसला या देवतेसमोर होतो. दोन्ही पक्षांना प्रत्येकी एक बकरा आणायला सांगितला जातो. त्यांच्या पायात चीर पाडून त्यात विष भरले जाते.

देवासमोर प्रथम प्राण त्याग ज्याचा बकरा करेल तो दोषी ठरवला जातो. गावात अकबराची पूजा केली जाते. जमलू ऋषींची अकबराने परीक्षा घेण्याचे ठरवले होते. परंतु ऋषींनी दिल्लीत बर्फवृष्टी करून अकबराला त्याची जागा दाखवून दिली होती. हे ग्रामस्थ स्वतःला सिकंदरचे वंशज मानतात.