लाईफस्टाईल

असे होणार Vicky Kaushal आणि Katrina Kaif चे लग्न !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :-  जयपूरमधील हॉटेल सिक्स सेन्स बरवाडा फोर्टमध्ये Katrina Kaif आणि Vicky kaushal लग्नाची तयारी सुरु झाली आहे लग्नासाठी येणाऱ्या VIP गेस्ट्ससाठी रणथंबोर रोडवरील ताज आणि ओबेरॉय हॉटेलही बुक करण्यात आलं आहे.

या हॉटेलमध्ये साधारण १२५ पाहुणे थांबणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे सगळे पाहुणे मुंबईवरून विमानाने जयपूरला येतील. जयपूर विमानतळावरून सगळ्या पाहुण्यांना लक्झरी गाड्यांमधून सवाई माधोपूरमध्ये आणलं जाईल. पाहुण्यांसाठी खास बस सर्व्हिस ठेवण्यात आली आहे.

तसेच बस सर्व्हिसकडून जयपूरवरून सवाई माधोपूरला येणाऱ्या पाहुण्यांसाठी ऑडी, बीएम डब्ल्यू, रेंज रोवर, २ व्हॅनिटी व्हॅन आणि एक सूपर लू(पोर्टेबल टॉयलेट) अशी सोय करण्यात आली आहे. कंपनीकडून या गाड्यांच्या ५० ड्रायव्हरसाठी रणथंबोर गेस्ट हाऊस बुक करण्यात आलं आहे.

विक्की आणि कतरिनाच्या लग्नासाठी मुंबईहून डिजे मागवण्यात आला आहे. हॉटेल सिक्स सेन्समध्ये ४८ खोल्या बुक करण्यात आल्या आहेत.

या खोल्यांमध्ये विक्की आणि कतरिनाचे नातेवाईक राहणार आहेत. इतर पाहुण्यांसाठी सवाई माधोपूरच्या हॉटेल ताज आणि ओबेरॉयमध्ये रुम बुक करण्यात आल्या आहेत सुरक्षेची जबाबदारी जयपूरच्या एमएच सिक्युरिटी कंपनीला देण्यात आली आहे. या कंपनीचे १०० बाऊन्सर हॉटेलच्या सुरक्षेसाठी तैनात असतील.

भीम सिंह पीलीबंगा हे संपूर्ण सुरक्षेची व्यवस्था पाहणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ७,८ आणि ९ डिसेंबरला लग्नाचे वेगवेगळे कार्यक्रम असतील. या तारखांच्या आधी किंवा नंतर पाहुण्यांना रणथंबोर टायगर सफारीचा अनुभव घेता येणार आहे. त्यासाठी एक ट्रॅव्हल एजंट नेमण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office