Swami Samarth : अनेक पंथ आणि संप्रदाय आहेत, त्यापैकी एक दत्त संप्रदाय आहे, ज्यांचे पूजनीय देवता भगवान दत्तात्रेय आहेत. या संप्रदायातील लोक भगवान दत्ताची पूजा करतात, तर श्री स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायाचे महान संत आणि गुरु मानले जातात. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे भगवान दत्तात्रेयांचे तिसरे अवतार मानले जातात.
श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतर स्वामी समर्थ महाराज हे भगवान दत्तात्रेयांचे तिसरे अवतार मानले जातात. हिंदू दिनदर्शिकेनुसार, दरवर्षी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन हा चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो, स्वामी समर्थ प्रकट दिन या वर्षी 10 एप्रिल 2024 रोजी साजरा केला जात आहे. हा सण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
श्री स्वामी समर्थ महाराज हे महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे १८५६ ते १८७८ या काळात दत्त संप्रदायाचे महान संत होते. त्यांच्या अवतारानंतर, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी स्वामी समर्थ प्रथमच महाराष्ट्रातील अक्कलकोट शहरात पोहोचले, म्हणून या शुभ तिथीला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जातो. या निमित्ताने आज आपण स्वामींचे असे विचार जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल.
जर तुमच्या मनात सतत वाईट, नकारत्मक विचार येतात. ज्यामुळे तुम्ही सतत दु:खी राहता. तर स्वामी समर्थांचे हे दहा विचार नेहमी लक्षात ठेवा.
श्री स्वामी समर्थांचे दहा विचार
अरे बाळा,
उदास असशील तर माझे नाव घे,
दु:खी असशील तर माझे ध्यान घे,
मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे,
एवाढ्याने समाधानी नसशील तर बाळ…अक्कलकोटची वाट घे…
वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. पणज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरु नका.
बाळा, मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो…फक्त एकदा हाक मार
लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही, कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही
तुला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नेस, तर डोळे बंद करुन माझे ध्यान कर, अशाने तु माझ्याशी संवाद साधशील
कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल,तर मा सांग
माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे,
त्यापर्यंत नक्की पोहचेल
विवेक बुद्धीने विचार करुन निर्णय घेतला असशील तर,
मागे हटू नकोस, ठाम राहा आणि ते कृतीत आण
जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा
कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल
तुला जर वाटत असेल की, कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपले दु:ख सांगून? तर खरा त्रास तू आता देत आहेस, काहीच न सांगून
अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल….