टोमॅटोच्या वापरामुळे ग्रामीण मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती एवढी उत्पन्न होते की, उबदार कपडे न घालताही ते कडाक्याच्या थंडीत न्यूमोनिया पासून सुरक्षित राहतात आणि उन्हाळ्याचे रणरणते ऊन त्यांच्यावर दुष्प्रभाव टाकू शकत नाही.
यामुळे मुलांसाठी टोमॅटोचा रस संत्र्याच्या रसात पेक्षा श्रेष्ठ मानला जातो. टोमॅटे माणसाची ताकद, बुद्धी व सौंदर्य वाढवण्यास जसा उपयुक्त आहे तसाच तो अनेक रोगांवरही रामबाण उपाय आहे. त्यापैकी काही उपाय खालील प्रमाणे :-
» मुलांमधील मुडदूस : – रिकेट्स म्हणजेच मुडदूस हा मुलांना होणारा हाडांचा आजार. टोमॅटोत कॅल्शियम बर्याच प्रमाणात असते. त्यामुळे याच्या सेवनाने मुलांची हाडे मजबूत होतात आणि त्यांच्या शरीराची वाढही होऊ लागते. त्यांना टोमॅटोचा ताजा रस दिवसातून दोन-तीन वेळा चार चार चमचे पाजत राहिल्यास मुडदूस नाहीसा होतो.
टोमॅटोच्या वापरामुळे ग्रामीण मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती एवढी उत्पन्न होते की, उबदार कपडे न घालताही ते कडाक्याच्या थंडीत न्यूमोनियापासून सुरक्षित राहतात आणि उन्हाळ्याचे रणरणते ऊन ही त्यांच्यावर दुष्प्रभाव टाकू शकत नाही. यामुळे मुलांसाठी टोमॅटोचा रस संत्र्याच्या रसात पेक्षा श्रेष्ठ मानला जातो.
» पोटाच्या व्याधी : – आपल्या आतड्यांमध्ये एक प्रकारच्या आरोग्यास उपयुक्त जीवाणू मोठ्या संख्येत असतात. ते अन्न पचवण्यास व अन्नातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करतात. टोमॅटो या जीवाणूंची उत्पत्ती वाढवून पोटाचे विकार दूर करतो.
यामुळे जी व्यक्ती वायुविकार, मुरड्याने त्रस्त असेल, जिचे पोट जड होत असेल, भूक कमी लागत असेल त्यांनी टोमॅटोचा रस घ्यावा. बद्धकोष्ठता असल्यास १0-१५ दिवस टोमॅटोचा रस घेतल्यास स्वाभाविकपणे ती दूर होते.
» मधुमेह : – मधुमेहींसाठी टोमॅटो अमृततुल्य आहे. कारण टोमॅटोत कार्बोहायड्रेट अत्यंत कमी प्रमाणात असते. लंडनचे डॉ. कॅम्ब्रेजन यांनी आपल्या अहवालात लिहिले आहे की, ‘ मधुमेहींसाठी टोमॅटो पेक्षा जास्त लाभदायक इतर कोणतेही खाद्यपदार्थ नाही. हे नियमित खाल्ल्यास लघवीतील शुगरचे प्रमाण हळू हळू कमी होत जाते व मधुमेह हळू हळू आपोआप दूर होतो.
» नेत्ररोग : – व्हिटॅमिन ‘ ए ‘ अभावी नेत्ररोग होत असतो व टोमॅटोत व्हिटॅमिन ‘ ए ‘ विपुल प्रमाणात असते. त्यामुळे याच्या सेवनाने व्हिटॅमिन ए ची पूर्तता होते. त्यामुळे नेत्ररोगांत टोमॅटो अत्यंत गुणकारी आहे.
» असामान्य किडनीशोधक : – जेव्हा शरीराला जास्त लघवी आणणाऱ्या पदार्थांची गरज असते तेव्हा आहारात टोमॅटोचे प्रमाण वाढवावे. कारण हे नैसर्गिक रित्या उत्तम मूत्रामलचे काम करते. पण लघवीत आग्जेलिक आम्लाच्या पुरेशा उपस्थितीच्या दशेत टोमॅटो खाऊ नयेत.
» मेंदू विकार : – मेंदू विकारात टोमॅटोचा रस पिणे गुणकारी असते. हे मेंदूची कमजोरी व चिडचिडेपणा दूर करते. मानसिक थकवा दूर् करून मेंदूला संतुलित राखते. स्मरणशक्ती कमकुवत असेल तर दिवसातून दोन वेळा एक एक पेला टोमॅटो रस प्यावा.
» इतर रोग : –
० टोमॅटोत व्हिटॅमिन ‘ सी ‘ पुरेशा प्रमाणात असल्यामुळे हे स्कार्वी सारख्या रोगासाठी एक उत्तम औषध आहे.
० वृद्ध रक्तदाबाच्या रुग्णांना टोमॅटो दिल्यास मिठाचे दुष्परिणाम टाळता येतात.
० टोमॅटोची प्रकृती थंड असल्यामुळे सकाळच्या नाश्त्यात घेतल्यास शरीराची उष्णता शांत होते.
० अशक्त व दुबळ्या व्यक्तीसाठी टोमॅटो विशेष लाभदायक असते.
० तापानंतर बहुधा रुग्णाच्या शरीरात हानिकारक आम्ल वाढते. या रूणांना पुन्हा स्फूर्ती व शक्ती देण्यासाठी टोमॅटो खाणे फायदेशीर असते.