Trigrahi Yog 2023 : ‘या’ 5 राशींसाठी उत्तम आहे हा काळ, नशिबाची मिळेल पूर्ण साथ !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Trigrahi Yog 2023 : ज्योतिषशास्त्रात चतुर्ग्रही आणि त्रिग्रही योगाला खूप महत्व आहे. गुरुवार, 17 ऑगस्ट रोजी सूर्याने सिंह राशीत प्रवेश केला आहे. दरम्यान, बुध, मंगळ हे ग्रह आधीच सिंह राशीत होते आणि आज 18 ऑगस्टला चंद्रही सिंह राशीत प्रवेश करणार आहे, अशातच हे चार ग्रह एकत्र आल्याने चतुर्ग्रही योग तयार झाला आहे.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा-जेव्हा तीन ग्रह कोणत्याही एका राशीत एकत्र येतात तेव्हा त्याला त्रिग्रही योग म्हणतात. सध्या सिंह राशीमध्ये मंगळ, शुक्र आणि बुध हे तिन्ही ग्रह एकत्र आहेत, त्यामुळे त्रिग्रही योगही तयार झाला आहे, हा अत्यंत दुर्मिळ योग मानला जातो. या दोन योगांमुळे अनेक राशीच्या लोकांचे नशीब उजळणार आहे, कोणत्या आहेत त्या राशी जाणून घेऊया.

मिथुन

चतुर्ग्रही योग या राशीच्या लोकांसाठी खूप लाभदायक ठरणार आहे. तृतीय घरात चतुर्ग्रही योग तयार झाल्याने या राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास वाढेल. नोकरी आणि व्यवसायासाठी ही वेळ एकदम उत्तम मानली जात आहे, या काळात तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात, पदोन्नती आणि नवीन नोकरीच्या ऑफर देखील येऊ शकतात.

अचानक धनलाभ होण्याची देखील चिन्हे आहेत. या काळात केलेल्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल. त्रिग्रही योगातून आर्थिक लाभ होण्याची चांगली शक्यता दिसत आहे. तुम्ही केलेल्या जवळपास सर्व योजना यशस्वी होतील. प्रवासाचे संकेत आहे, जे फायदेशीर ठरतील. यावेळी तुम्हाला बुधादित्य राजयोगाचा लाभ देखील मिळेल.

मेष

सिंह राशीत बनलेला त्रिग्रही योग या राशीच्या लोकांसाठी शुभ मानला जात आहे. या काळात तुम्हाला उच्च पद मिळू शकते. यामुळे तुम्हाला समाजात मान मिळेल. नशीबाची साथ आहे, केलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. तसेच तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहील. व्यवसायासाठीही काळ उत्तम आहे, लाभाचे संकेत आहेत. विशेष म्हणजे मेष राशीच्या लोकांना बुद्धादित्य आणि वासी राजयोगाचा देखील फायदा होईल.

वृश्चिक

चतुर्ग्रही योग मूळ राशीच्या लोकांसाठी शुभ मानला जातो. या काळात त्यांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील. पदोन्नती आणि उत्पन्नात वाढ होण्याचीही चिन्हे आहेत. उत्पन्नाचे नवीन स्रोतही मिळू शकतात. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगल्या ऑफर मिळू शकतात. कुठूनतरी अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामावर उच्च अधिकारी प्रसन्न होऊ शकतात. संसप्तक योगाचे लाभ मिळण्याचीही शक्यता आहे.

वृषभ

या राशीच्या लोकांसाठी चतुर्ग्रही योग अतिशय शुभ मानला जात आहे. या काळात कामात यश मिळू शकते. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा सुधारेल आणि आरोग्य देखील चांगले राहील. आपल्याला सुख-सुविधांसोबतच अमाप संपत्ती मिळू शकते. बरेच दिवस रखडलेले काम आता पूर्ण होऊ शकते. या काळात नशीब पूर्ण साथ देईल. काही चांगली बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी यशाचे संकेत आहेत. तुम्हाला संसप्तक योगाचाही लाभ मिळू शकतो.

तूळ

चतुर्ग्रही योग फलदायी ठरणार आहे. या काळात समाजात मान-सन्मान मिळेल. कामांची प्रशंसा होईल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ चांगली आहे. या काळात अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नशिबामुळे थांबलेली कामे लवकरात लवकर पूर्ण होतील. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. त्रिग्रही योगाने धन लाभाचे चांगले योग तयार होत आहेत. समाजात तुमचा मान-सन्मान, प्रतिष्ठा वाढण्याची चिन्हे आहेत. ज्या लोकांचे कोणतेही कायदेशीर प्रकरण चालू आहे, त्याच्या बाजूने निकाल लागतील.