लाईफस्टाईल

फक्त करा ‘हे’ उपाय,बटाटे महिनाभर नाही होणार खराब! अशा पद्धतीने करा बटाट्यांना स्टोअर, वाचा माहिती

Published by
Ajay Patil

स्वयंपाक घरामधील जर आपण भाजीपाला पाहिला तर यामध्ये कांदे आणि बटाटे हे दोन्ही प्रकारचा भाजीपाला लवकर खराब होतो. कारण त्यांना मोड लवकर येतात व त्यामुळे ते खाण्यालायक राहत नाहीत. कांद्यापेक्षा जर आपण बटाटा बघितला तर बऱ्याच जणांच्या आहारातील एक आवडता खाद्यपदार्थ असून प्रत्येक घरामध्ये बटाट्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

त्यामुळे प्रत्येक घरामध्ये आपल्याला बटाटा आढळून येतो. बऱ्याच घरांमध्ये तर जास्त दिवस पुरेल इतक्या बटाट्याचा स्टोअर केला जातो. परंतु बटाट्याच्या बाबतीत प्रमुख समस्या म्हणजे बटाट्याला लवकर मोड येतात किंवा बटाटा लवकर खराब होतो.

त्यामुळे बटाटा साठवताना किंवा घरात ठेवताना काही गोष्टींची काळजी घेण्याची खूप गरज असते. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की बटाटा महिनाभर खराब होऊ नये किंवा त्यांना मोड येऊ नये तर काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते व त्यासंबंधीची माहिती आपण या लेखात पाहू.

 बटाटा घरात ठेवताना अशा पद्धतीने घ्या काळजी, महिनाभर नाही होणार खराब

1- बटाटे उजेडमध्ये नका ठेऊ जेव्हा  आपण बाजारामध्ये बटाटे विक्रेत्यांकडे बटाटा खरेदी करायला जातो तेव्हा आपण पाहतो की त्यांनी बटाटे एखाद्या गोणीमध्ये किंवा ट्रेमध्ये झाकून ठेवलेले असतात.बटाटे साठवताना अशा पद्धतीने काळजी घेतली जाते की त्या ठिकाणी प्रकाश किंवा उजेड नसेल.

त्यामागील प्रमुख कारण म्हणजे बटाटे शक्यतो अंधारात ठेवले तर त्यांना मोड येण्याचे प्रमाण खूप कमी होते. थोडासा अंधार आणि कोरड्या जागेत जर बटाटे ठेवले तर ते खराब होत नाहीत व त्यांना मोड येत नाहीत.

2- हिरवे पालेभाजीचा उपयोग कोणत्याही प्रकारची हिरवी वनस्पती असेल तर ती बटाटे ताजे ठेवायला खूप मोठ्या प्रमाणावर मदत करते व अशा पद्धतीने हिरव्या औषधे वनस्पती जवळ बटाटे ठेवल्याने त्याला मोड देखील फुटत नाहीत. त्यामुळे एखाद्या कापसाचे किंवा मलमलची पिशवी घेऊन त्यामध्ये पालेभाजी ठेवा व मग त्यात बटाटे भरून ठेवले तर फार मोठा फायदा होतो व बटाटे खराब होत नाही.

3- पाणीदार फळांसोबत बटाटे स्टोअर करू नयेसफरचंद, संत्री किंवा अन्य फळे बटाट्यासह ठेवू नये. उदाहरणार्थ जर कांदे आणि सफरचंदाच्या सोबत बटाटे ठेवले तर बटाटे खराब होण्याची शक्यता वाढते. कारण कांदे आणि सफरचंद हे इथीलिन वायू उत्सर्जित करतात व त्यामुळे मोड येण्याची  प्रक्रिया वाढते.

यामध्ये जो काही अभ्यास करण्यात आलेला आहे त्या अभ्यासामध्ये दिसून आले आहे की सफरचंद बटाट्यांसह ठेवले तर बटाट्यांना मोड येण्याची वेळ वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जास्त पाणीदार फळे असतील तर त्यांच्यासोबत बटाटे स्टोअर करू नये.

4- आद्रता नसलेल्या जागी बटाटे स्टोअर करा बटाट्याच्या ज्या ठिकाणी तुम्ही स्टोअर केलेले आहेत अशा ठिकाणी जर आद्रता असेल तर पटकन मोड येण्याची शक्यता असते. बटाटे स्टोअर करताना बटाटे ओले नसतील याची खात्री करावी. असच बटाट्यांना धूळ वगैरे लागली असेल तर ती फडक्याने पुसून घ्यावी. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बटाटे फ्रिजमध्ये चुकून देखील ठेवू नये.

Ajay Patil