अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- रात्री झोपताना वेळ मिळतो तेव्हा आपण मोबाईल वापरतो . दिवसभर डोळे उघडे असल्याने त्यांना आराम मिळत नाही . रात्रीच्या वेळी आपण टाईमपासाठी किंवा कामासाठी मोबाईल वापरतो .
त्यामुळे डोळ्यातून पाणी येणे , डोळे लाल होणे अशा समस्या उद्भवतात . जेव्हापासून जग मोबाईल किंवा इंटरनेटमुळे जवळ येऊ राहिलाय तसा मोबाईलचा वापरही वाढू लागलाय .
मोबाईलचा अतिवापर आपल्या डोळ्यांसोबतच शरीरासाठीही घातक ठरू शकतो . रात्रीच्या वेळी मोबाईल वापरताना काहीजण ब्राईटनेस जास्त ठेवतात .
रात्रीच्या अंधारात ब्राईटनेस जास्त ठेवल्यामुळे डोळ्यांवर त्याचा परिणाम जाणवतो . डोळ्यांना हळूहळू कमी दिसायला लागत . फोनमधून निघणारा प्रकाश डोळ्यांसाठी घातक असतो .
हळूहळू डोकं दुखायला लागण्याची समस्याही उद्भवते . दिवसभर काम करत असल्याने आपल्या डोळ्यांना आराम भेटत नाही .रात्रीच्या वेळी त्यात आपण मोबाईल वापरतो .
त्यामुळे डोळे हळूहळू सुकायला लागतात . डोळ्यांना जळजळण्याचा त्रास होतो आणि मोतीबिंदुवरही परिणाम होतो . मोबाईलमधून बाहेर पडणारा प्रकाश डोळ्यांसाठी घातक असतो .
त्यामुळे डोळ्यातून सतत पाणी यायला लागत . कायम कायम मोबाईल वापरल्यामुळे डोळ्यांच्या पापण्या झाकण्याची प्रक्रिया सावकाश होऊन डोळे सुजतात . त्यामुळे रात्रीच्या वेळी मोबाईलचा कमीत कमी वापर करूयात आणि डोळ्यांना सुरक्षित ठेवुयात