Vastu Tips: ज्योतिष शास्त्र, अंकशास्त्र या शास्त्रांना जितके भारतीय परंपरेमध्ये महत्त्व आहे तितकेच महत्त्व हे वास्तुशास्त्राला आहे. वास्तुशास्त्र हे असे शास्त्र आहे की यामध्ये तुम्ही जर घराचे बांधकाम करत असाल किंवा नवीन घर विकत घेत असाल तर प्रामुख्याने घरातील किचन पासून तर बेडरूम पर्यंत सगळ्या गोष्टी या वास्तुशास्त्रानुसार करण्यावर प्रत्येकाचा भर असतो.
घरात कोणती गोष्ट कोणत्या ठिकाणी ठेवावी किंवा घराला कोणता रंग द्यावा, कोणत्या दिशेला कोणता रंग असावा इत्यादी बद्दलचे निर्णय देखील वास्तुशास्त्रानुसारच घेतले जातात.
भारतीय परंपरेमध्ये वास्तुशास्त्राला खूप महत्त्व असल्याचे आपल्याला दिसून येते. अगदी याच प्रमाणे आपण बघितले तर घरामध्ये देवघर असते किंवा त्या देवघरात आपण देव्हारा ठेवत असतो.
परंतु वास्तुशास्त्रानुसार बघितले तर देव्हाऱ्यामध्ये काही गोष्टी ठेवणे हे घराच्या आणि व्यक्तीच्या आर्थिक दृष्टिकोनातून व आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील विपरीत परिणाम घडवून आणू शकते. त्यामुळे या लेखात आपण देव्हाऱ्यामध्ये कोणत्या गोष्टी ठेवू नये? त्याबद्दलची माहिती बघणार आहोत.
देव्हाऱ्यात या गोष्टी ठेवताना करू नका या चुका
1- खराब किंवा तुटलेली मूर्ती– देव्हाऱ्यामध्ये कधीही खराब झालेली किंवा तुटलेली मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार बघितले तर अशा प्रकारची खराब झालेली किंवा तुटलेली मूर्ती किंवा फोटो जर ठेवला तर आर्थिक अडचणी किंवा आर्थिक चणचणीत वाढ होऊ शकते.
2- शिवलिंग ठेवणे– तुम्हाला जर घराच्या देव्हाऱ्यामध्ये शिवलिंग ठेवायचे असेल तर वास्तुशास्त्रानुसार शिवलिंग हे अंगठ्यापेक्षा मोठ्या आकाराचे असता कामा नये.
3- देव्हाऱ्यात शंख ठेवणे – आपण देव्हाऱ्यामध्ये शंख ठेवत असतो. परंतु जर देव्हाऱ्यामध्ये शंख ठेवायचे असतील तर ते एकापेक्षा जास्त असू नयेत. वास्तुशास्त्रानुसार बघितले तर देव्हाऱ्यात एकापेक्षा जास्त शंख ठेवले तर त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
4- धार्मिक पुस्तके– तुमच्या घरामध्ये जर फाटलेली धार्मिक पुस्तके असतील तर ती देखील देव्हाऱ्यात ठेवू नये. कारण वास्तुशास्त्रानुसार बघितले तर अशा प्रकारची फाटलेली धार्मिक पुस्तके देव्हाऱ्यात ठेवली तर त्यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होते. त्यामुळे अशा प्रकारचे पुस्तके ठेवणे टाळावे.
5- सुकलेली फुले– वास्तुशास्त्रानुसार बघितले तर देव्हार्यामध्ये सुकलेली फुले अजिबात ठेवू नये.
6- तीक्ष्ण वस्तू– वास्तुशास्त्रानुसार बघितले तर घरातील देव्हाऱ्यामध्ये कात्री किंवा इतर तीक्ष्ण वस्तू कधीही ठेवू नये. जर अशा प्रकारच्या वस्तू देव्हाऱ्यामध्ये ठेवल्यात तर नकारात्मक ऊर्जा तयार होते.
7- देव्हार्याच्या वर काही वस्तू ठेवणे– बऱ्याचदा आपण बघतो की देव्हाऱ्याच्या वरती काही वस्तू ठेवण्याची सवय अनेक जणांना असते. यामध्ये प्रामुख्याने कुंकू तसेच हळद, अगरबत्ती किंवा बंद पणत्या इत्यादी गोष्टी वरती ठेवतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार बघितले तर देवाच्या डोक्यावर अशा प्रकारच्या जास्त वस्तू ठेवू नये.
8- देव्हार्यावर धूळ साचू देऊ नये– घरात जर देव्हारा असेल तर तो नेहमी स्वच्छ ठेवणे खूप गरजेचे आहे. देव्हार्यावर किंवा देव्हाऱ्यामध्ये ठेवलेल्या देवाच्या फोटोवर धूळ साचू देऊ नये आणि ते वारंवार स्वच्छ करावे. देव्हाऱ्यातील देवांची दररोज पूजा करावी. तरच घरामध्ये सुख समृद्धी राहते.