Vastu Tips Marathi News : घरातील बेडरूममध्ये चुकूनही ठेवू नका या गोष्टी, अन्यथा वैवाहिक जीवनात येईल कलह

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vastu Tips Marathi News : घरातील कोणत्याही वस्तू योग्य दशेला ठेवणे कधीही शुभ मानले जाते. तसेच घरामध्ये सातत्याने अनेक चुका तुमच्याकडून होत असतात. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार घरातील विविध कामे करणे आवश्यक आहे.

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी ठेवणे शुभ किंवा अशुभ मानले जाते. त्यामुळे वास्तुशास्त्रात सांगण्यात आलेल्या वस्तूच घरामध्ये ठेवाव्यात. तसेच या वस्तू योग्य दिशेला ठेवणे गरजेचे आहे.

बेडरूममध्ये देखील काही वस्तू ठेवणे अशुभ मानले जाते. घरामधील बेडरूम नेहमी महत्वाची मानली जाते. घरातील बेडरूममधील ऊर्जेचा देखील घरामध्ये परिणाम होत असतो. जर पाहिलं चुका केल्या तर तुमच्या वैवाहिक जीवनात कलह येऊ शकतो.

बेडमधील पलंग या दिशेला असावा

घरातील अनेक वस्तू योग्य दिशेला असणे आवश्यक असते. तसेच तुमच्या बेडमधील पलंग देखील नेहमी दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला असावा. या दिशेला बेड असणे शुभ मानले जाते. तसेच पलंगाचा चेहरा दरवाजाकडे नसावा.

या रंगांनी तुमची बेडरूम रंगवा

वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराचा रंग देखील शुभ अशुभ गोष्टी दर्शवत असतो. तसेच बेडरूमचा रंग तुमच्या नातेसंबंधावर अधिक प्रभाव पडू शकतो. बेडरूममध्ये निळा रंग सत्य आणि समर्पणाचे प्रतीक आहे तर हिरवा रंग आनंदी आणि सौहार्दपूर्ण वातावरणाचे प्रतीक आहे.

बेडरूममध्ये कधीही आरसा वापरू नका

अनेकजण त्यांच्या बेडरूममध्ये आरसा वापरत असतात. मात्र असे करणे तुमच्या वैवाहिक जीवनासाठी अशुभ ठरू शकते. त्यामुळे झोपताना बेडरूममध्ये आरसा ठेवणे टाळा. तसेच जर बेडरूममध्ये आरसा असेल तर तो झाकून ठेवा. जितका मोठा आरसा तुमच्या बेडरूममध्ये असेल तितका तणाव तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये निर्माण होऊ शकतो.

बेडरूममध्ये या गोष्टी वापरू नका

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये किंवा बेडरूममध्ये अनेक गोष्टी ठेवणे टाळले पाहिजे. उत्तर कोपऱ्यात इनडोअर प्लांट्स आणि दक्षिण-पश्चिम कोपर्यात पांढरी फुले. तसेच बदक किंवा हंस यांसारख्या सजावटीच्या वस्तू ठेवणे नेहमी टाळा.

बेडरूममध्ये नैसर्गिक प्रकाश येऊ द्या

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये सूर्यप्रकाश येणे नेहमी शुभ मानले जाते. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून सकारात्मक ऊर्जा तयार होते. तसेच घरामध्ये आनंददायी वातावरण निर्माण होते. बेडरूममध्ये प्रकाश येणे तुमच्या वैवाहिक जीवनासाठी चांगले मानले जाते.