Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये अनेक चुकीची कार्ये तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करत असतात. त्यामुळे घरातील कोणतेही कार्ये करताना हे वास्तुशास्त्रानुसार करणे शुभ मानले जाते. तसेच नवीन घराची इमारत बांधण्यापूर्वी तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा निवडणे देखील आवश्यक आहे.
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये चुकीच्या दिशेला अनेक वस्तू ठेवणे तुमच्यासाठी अशुभ ठरू शकते. तसेच घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असतात. त्यामुळे घरामध्ये अनेक समस्या देखील निर्माण होत असतात.
घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असेल तर अनेकांच्या घरामधील वातावरण ठीक नसते. घरामध्ये सतत भांडण होत असतात. तसेच याचा परिणाम घरातील सदस्यांच्या आरोग्यावर होत असतात.
घरामध्ये तुमच्या अनेक चुकांमुळे नकारात्मक ऊर्जा तयार होतात. त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनावरही त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे घरातील अनेक वस्तूंच्या दिशांमध्ये बदल करणे देखील गरजेचे आहे.
वास्तुदोष टाळण्यासाठी घरात हे बदल करा
भिंतीवर चित्र चिकटवू नका
जर तुम्हालाही तुमच्या घरामध्ये अनके प्रकारची चित्रे चिटकवण्याची सवय असेल तर ती आजच बंद करा. कारण अशी चित्रे घरातील भिंतीवर चिटकवणे तुमच्यासाठी महागात पडू शकते. भिंतीवर चित्र चिटकवल्याने घरामध्ये वास्तुदोष निर्माण होत असतात..
अशा मूर्ती मंदिरात ठेवू नका
तुम्हीही तुमच्या घरातील देवघरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मुर्त्या ठेवत असाल तर आजच सावध व्हा. कारण अशा मुर्त्या घरामध्ये ठेवणे तुमच्यासाठी अशुभ ठरू शकते. मां काली व्यतिरिक्त उभ्या असलेल्या किंवा तुटलेल्या मुर्त्या कधीही ठेऊ नयेत. जर तुम्ही असे केले तर तुमच्याही घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते.
या दिशेने दरवाजे आणि खिडक्या उघडू नका
जर तुम्ही तुमच्या नवीन घराच्या वास्तुचे बांधकाम करणार असाल तर ते वास्तुशास्त्रानुसार करा. घरातील खिडक्या आणि दरवाजे उघडताना ते बाहेरच्या बाजूने उघडतील असे कधीही बनवू नका. कारण जर तुम्ही असे केले तर घरातील सदस्यांना मानसिक त्रास आणि अडचणींना सामोरे जावे लागू शकते. वास्तुशास्त्रानुसार घराचे दरवाजे आणि खिडक्या नेहमी आतून उघडल्या पाहिजेत. यामुळे वास्तुदोष होत नाही.
या पक्ष्यांना घरात येऊ देऊ नका
जर तुमच्या घरामध्ये वटवाघुळ येत असेल तर तुमच्याही घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकतात. तसेच घरातील सदस्यांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागू शकते. वटवाघूळ घरामध्ये आल्यास किमान १५ दिवस वास्तुदोष राहतो असे सांगितले जाते. म्हणूनच घरामध्ये कधीच वटवाघूळ येऊ देऊ नये.