अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 : वाहन निर्मिती क्षेत्रामध्ये अनेक कंपन्या वेगवेगळे प्रयोग करत असतात. नवनवीन व्हर्जन देऊन ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी नवनवीन संकल्पना कंपन्या वापरत असतात.
स्कुटर या टुव्हीलर प्रकारात क्रांती करणाऱ्या पियाज्जो इंडियाने आपले दोन स्कूटर्स वेस्पा व्हीएक्सएल आणि वेस्पा एसएक्सएलचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच केले आहे.
वेस्पाच्या या दोन्ही नवीन स्कूटर्सला कंपनीच्या वेबसाईट्सवरून केवळ 1 हजार रुपयांमध्ये बूक करता येणार आहेत. कं पनीचे हे दोन्ही स्कूटर्स 125सीसी आणि 150सीसी इंजिन पर्यायामध्ये उपलब्ध असतील.
यात नवीन बीएस 6 कम्प्ल्यांट इंजिन देण्यात आलेले आहे. वेस्फा व्हीएक्सएल आणि एसएक्सएल फेसलिफ्ट स्कूटर्स आधीप्रमाणे मोनोकॉक स्टील बॉडी आणि 5 स्पॉक एलॉय व्हिल्जसोबत रेट्रो इटॅलियन स्टायलिंगसोबत येते.
अपडेटेड मॉडेल्समध्ये नवीन एलईडी हेडलाईट्स आणि एलईडी डेटाटाईम रनिंग लाईट देण्यात आली आहे. याशिवाय स्कूटर्समध्ये यूएसबी चार्जिंग पोर्ट, बूट लाईट, एजस्टेबल रिअर सस्पेंशन देण्यात आले आहे.
फ्रंटला टेलेस्कोपिक फ्रंट फोर्क्स संस्पेंशन देण्यात आलेले आहेत. या दोन्ही स्कूटर्स या महिन्याच्या अखेरीस लाँच होणार आहेत. कंपनीने अद्याप स्कूटर्सच्या किंमतीबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews