वेताची खाट भारतात ‘आऊटडेटेड’ पण अमेरिकेत आहे लाखमोलाची

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणे ही भारतीयांची कधीही न मोडली जाणारी खोड आहे. भारतीय परंपरेतून निर्माण झालेल्या आणि भारतीय वातावरणाला साजेशा अशा अनेक गोष्टींचा आपण भारतीयांनी केवळ पाश्चात्त्यांच्या अनुकरणामुळे त्याग केला आहे. पाश्चात्त्यांच्या बेडमुळे आपली अस्सल भारतीय वेताची खाट आता इतिहासजमा झाल्या आहेत.

बांबू आणि वेतापासून तयार केली जाणारी ही खाट खरेतर आरामदायी असते. पण आता पुढारलेल्या भारतात ही खाट आऊटडेटेड झाली आहे. मात्र याच बांबूच्या खाटेला अमेरिकेमध्ये भलतीच मागणी आहे. भारतात कधीकाळी पन्नास-शंभर रुपयांमध्ये मिळत असलेली ही खाट सध्या अमेरिकेत लाखभर रुपयांना विकली जात आहे.

भारतात आजही ग्रामीण भागांत बांबू आणि वेताच्या पट्ट्यांपासून तयार होणाऱ्या या हलक्याफलक्या खाटा वापरल्या जातात. विशेषतः घरासमोरील अंगणात चारचौघांसोबत बसण्यासाठी या बांबूच्या खाटा आजही वापरल्या जातात.

कोणत्याही वेस्टर्न बेडहून त्या जास्त आरामदायक आणि वापरण्यास अत्यंत सुलभ असतात. मात्र पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावामुळे भारतात आता अशा खाटा सहसा वापरल्या जात नाहीत. मात्र त्याच खाटा अमेरिकेमध्ये लाखभर रुपयांना विकल्या जात आहेत. अमेरिकेसह अन्य युरोपीय देशांमधूनही अशा वेताच्या खाटांना खूप मागणी आहे.