अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :- अभिनेत्री कतरिना कैफ व अभिनेता विकी कौशल हे येत्या डिसेंबर महिन्यात राजस्थानमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याचा चर्चा आहेत. या दोघांनीही अद्याप त्यांच्या लग्नाबाबत अधिकृतरित्या सांगितलेले नाही.
अतिशय खासगी आणि तितक्याच दिमाखदार अशा या विवाहसोहळ्यासाठी आता त्याच पद्धतीनं तयारीही सुरु करण्यात आली आहे.
राजस्थानातील जयपूर येथे एका ऐतिहासिक ठिकाणी विकी आणि कतरिनाचा विवाहसोहळा पार पडणार आहे. बी-टाऊनच्या या मोस्ट हॅपनिंग जोडीकडे सर्वांचच लक्ष असताना त्यांनी लग्नसोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांना मात्र काही नियम आखून दिले आहेत.
सर्वात महत्त्वाचा नियम असेल, मोबाईल न आणण्याचा. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होता कामा नये, यासाठीच हा सारा घाट घालण्यात येत आहे. येत्या 7 ते 9 डिसेंबरदरम्यान त्यांचे लग्न होणार असल्याचे बोलले जात आहे.
सध्या त्यांची लग्नाची खरेदी चालू असून प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाची त्यांच्या लग्नाचे कपडे डिझाईन करत आहे. कतरिना व विकी यांच्या लग्नाची तयारी जरी जोरदार सुरू असली
तरी ते लग्नानंतर लगेच पुन्हा कामाला लागणार असल्याचे समजते. आधीच ठरलेल्या शूटींगच्या तारखांमुळे या दोघांना हनीमूनलाही जाता येणार नसल्याचे बोलले जात आहे.