उन्हाळ्यात शरीर ठेवायचय स्वस्थ्य? करा ‘या’ फळांच सेवन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-  उन्हाळ्यात बर्‍याचदा अशक्तपणा येत असतो. कारण उष्णतेमुळे शरीराची झीज होते. शरीरातील ग्लुकोजचे परिणाम उष्णतेमुळे कमी होते.

यासाठी उन्हाळयांमद्धे फळांचे सेवन करणे फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात जर हे 5 फळांचे सेवन केले तर खूप फायदे होतील.

1) आंबा आंब्यात फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई सारखे अनेक पोषक घटक असतात. यासह पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम खनिजे देखील समृद्ध असतात. हे शरीरातील कोलेस्ट्रॉल संतुलित करण्यास मदत करते. या कारणास्तव आंब्याचे सेवन करणे फायदेशीर आहे.

2) टरबूज हे फळ दिसायला जितके सुंदर असते, तितकेच ते उन्हाळ्यात फायदेशीर असते. टरबूजमध्ये जास्त प्रमाणात पाणी असते. जे शरीरातील पाण्याची आवश्यक पातळी राखण्यास मदत करते.

3) खरबूज खरबूज हे टरबूजासारखेच रसाळ असते. त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 6 व्यतिरिक्त फायबर आणि फॉलिक अ‍ॅसिड सारख्या घटकांचा समावेश आहे. ते शरीरासाठी फायदेशीर आहे. दररोज खरबूजचे सेवन आपल्या हृदयासाठी तसेच आपल्या डोळ्यांसाठी चांगले आहे.

4) संत्री हृदयाशी संबंधित आजारांव्यतिरिक्त संत्री मधुमेहापासून सुटका करण्याचे देखील काम करते. यास सकाळी रिकाम्या पोटी आणि जेवण झाल्यानंतर लगेच खाऊ नये. असे केल्याने ते हानिकारक ठरू शकते.

5) द्राक्ष शेवटी, द्राक्षांबद्दल बोलूया. द्राक्षांमध्ये देखील पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. ते हाडांमध्ये कॅल्शियमची पातळी वाढवतात. याशिवाय जास्त पाण्यामुळे शरीरही हायड्रेटेड राहते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24