नेहमीच चिरतरुण दिसायचंय? करा ‘हे’ घरगुती उपाय

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

आपल्या शरीरावर बदलत्या जीवनशैलीचा विपरीत परिणाम होत असतो. अवेळी जेवन, व्यायामाचा अभाव, जागरण यामुळे शरीराचा बिघाडतर होतोच त्याशिवाय सुंदरता ही जाते. आपल्याला नेहमीच चिरतरुण दिसायचे असेल तर हे उपाय करा

१) प्राणायाम : दर रोज सकाळी प्राणायाम करावे जेणे करून आपले फुफ्फुस चांगल्यारीत्या कार्य करतील ताण दूर होईल. श्वसन तंत्र चांगले काम करतील. हृदय स्वस्थ राहील.

२) आहारामध्ये प्रथिनांचा समावेश करा आपल्या जेवणात प्रथिनांचा समावेश करा. दूध, बदाम, चणे खावे. व्यायामानंतर चणे खावे. ह्यात भरपूर प्रमाणात प्रथिन असतात. जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे.

३) व्हिटॅमिन डी घेणे – व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी आवश्यक असतं आणि व्हिटॅमिन डी आपल्याला सूर्याच्या किरणांपासून मिळते.

जमल्यास सकाळी कोवळ्या उन्हात बसावे त्या पासून आपल्याला व्हिटॅमिन मिळते. दररोज असे करणे शक्य नसल्यास जमेल तेव्हा करावे. असे केल्याने शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता होणार नाही.

४) मसाज – शरीरामध्ये रक्त भिसरण चांगले होण्यासाठी आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा तरी स्पा किंवा मसाज करावी असे केल्यास रक्त विसरण चांगले होईल आणि तणाव कमी होण्यास मदत मिळेल.

५) ध्यानस्त बसा – मेडिटेशन करून आपण आपल्या शरीरास तेजवान आणि निरोगी ठेऊ शकतो. मेडिटेशन कामाच्या ताणाला कमी करते.

६) डोळ्यांना विश्रांती द्या – आजचे युग कॉम्पुटरचे आहे. दिवस रात्र कॉम्पुटर आणि लॅपटॉप वरूनच सर्व काम केले जातात. त्यामुळे कॉम्प्युटर स्क्रीन पासून निघणाऱ्या किरणांमुळे डोळ्याला इजा होऊ शकते.

त्यासाठी डोळ्यांना आराम द्या 2 -3 मिनिटे डोळे बंद करून बसा. असे केल्यास डोळ्याचा ताण कमी होईल. अधून मधून आपले डोळे थंड पाण्याने धुवा.

७) जॉगिंग – काही लोक आपल्या शरीराला फिट ठेवण्यासाठी व्यायाम करतात, जॉगिंगला जातात. पण काही कारणास्तव वेळ मिळत नसल्यास जेव्हा वेळ मिळेल स्वतःच्या जागेवरच धावावे.

धावल्याने रक्त विसरण चांगले होते आणि शरीर निरोगी राहत. वेळोवेळी आपल्या चिकित्सकांचे योग्य तसे मार्गदर्शन घ्या. स्वस्थ राहा मस्त राहा.

अहमदनगर लाईव्ह 24