अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे सोन्या- तसेच चांदीच्या दरामध्ये चढ उतार पाहायला मिळतो आहे. यातच १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,६९० रुपये आहे.
मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,०१० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. तर चांदी ६७,२०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
जाणून घ्या आजचा भाव
मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,६९० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,९४० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,८१० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,१२० रुपये असेल.
नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,७४० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,९९० रुपये इतका असेल. तर चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६७२ रुपये आहे.
सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही.
सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच २४ कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण २४ कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. सामान्यपणे २२ कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये ९१.६६ टक्के सोने असते.