लाईफस्टाईल

पावसाळ्यात ओलसर कपडे घालतायेत? होऊ शकतो ‘हा’ बुरशीजन्य आजार, वाचा सविस्तर अन ‘अशी’ घ्या काळजी

Published by
Ahmednagarlive24 Office

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसारच असते. तसेच कपडे सुकण्यासही अडचण येते. त्यामुळे बऱ्याचदा अनेकजण ओलसर कपडेच पावसाळ्यात घालत असतात.

परंतु हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्याचे कारण असे की, ओलसरपणा हे बुरशीचे प्रजननस्थळ आहे. येथे बुरशी अतिशय झपाट्याने वाढत असते. त्यामुळे बुरशी आधारित संसर्गाच्या वाढीसाठी हे पोषक वातावरण समजले जाते.

त्यामुळे पावसाळ्यात शक्यतो ओलसर कपड्यांमुळे फंगल इन्फेक्शनची समस्या जाणवते. हे इन्फेक्शन सामान्यतः त्वचा, केस, नखे तसेच तोंडाचा आतील भाग यावर बघण्यास मिळते.

फंगल इन्फेक्शन म्हणजे काय
बुरशीमुळे होणाऱ्या आजाराला फंगल इन्फेक्शन म्हणतात. ते कसे दिसते आणि ते तुमच्या शरीरावर कुठे आहे,

यावरून डॉक्टर सहसा त्याचे निदान करू शकतात. बुरशीजन्य त्वचेच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी, अँटीफंगल औषधे घेणे गरजेचे ठरते.

पावसाळ्यात विशेष काळजी घ्या
पावसाळ्यात घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. पावसाने कपडे ओलसर होणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच चांगल्या दर्जाचे सनस्क्रीन लोशन लावावे. पावसाळ्यातील थंड वातावरणामुळे ओठ निस्तेज आणि कोरडे पडू शकतात.

अशावेळी पावसाळ्यात ओठांवर लिप बाम लावावा. यासह तज्ज्ञांच्या सल्ल्याने काही काळजी घेणे गरजेचे आहे. दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी घ्यावे, अति मेकअप करू नये, दिवसभरात दोन-तीन वेळा चेहरा धुवा.

त्वचा कोरडी ठेवा, पावसात भिजू नका, भिजल्यास अंग, केस चांगले कोरडे करा. ओले कपडे परिधान करू नये. आहार संतुलित असला पाहिजे. असे केल्यास त्वचेची योग्य प्रकारे काळजी राखली जाते.

संसर्गजन्य आजार
फंगल इन्फेक्शन हा संसर्गजन्य आजार आहे. तो कुटुंबामध्ये एकापासून दुसऱ्याला होऊ शकतो. त्यामुळे एकमेकांचे कपडे वापरू नये. रुग्णांचे कपडे वेगळे ठेवावे. फंगल इन्फेक्शनवरील उपचारांसाठी त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असा सल्ला तज्ञ देतात.

Ahmednagarlive24 Office