या राशींच्या लोकांना हा आठवडा जाणार आनंदात, जाऊन घ्या साप्ताहिक राशीभविष्य 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल हा आठवडा ? जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य…

मेष :- पैसे गुंतवताना घाईगडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी बोलू नका – तुम्ही प्रेम करीत असलेल्या व्यक्ती दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घ्या. अनोख्या रोमान्सचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे. आपला रिझ्यूम पाठविण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला सप्ताह

वृषभ :- कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा. तुमचे काम जवळून पाहणा-यांना तुमच्या काम करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीबद्दल कुतूहल निर्माण होईल. . सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम आहे. तुमचा/तुमची त्याच्या/तिच्या कामात इतका व्यस्त होईल की, तुम्ही त्यामुळे अस्वस्थ व्हाल.

मिथुन :- तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणा-या फुलासारखा दरवळेल. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. नातेवाइकांना भेटून तुम्ही कल्पना केली असेल, त्यापेक्षा बरे घडेल. प्रेमामधील तुमच्या असभ्य वर्तणुकीची माफी मागा. 

कर्क :-  प्रवास करावा लागणार असेल, तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. तुम्ही तुमच्या वैवाहिक आयुष्यातल्या दु:खद आठवणी विसरून जाल आणि वर्तमानकाळ साजरा कराल.आणखी आशावादी राहण्यासाठी स्वत:ला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल.

सिंह :- . निष्काळजीपणामुळे काही तोटा निश्चितपणे होईल. मुलांमुळे दिवस खूप कठीण होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी वात्सल्याने वागा आणि त्यांच्यावरील अनावश्यक ताण दूर करून त्यांचा इंटरेस्ट कायम ठेवा. प्रेमानेच प्रेम वाढते हे कायम लक्षात ठेवा. आनंदी दिवसासाठी मानसिक ताणतणाव आणि दडपण बाजूला सारा. 

कन्या :- कला, साहित्य, लेखन, पत्रकारिता, संगीत, सोन्या-चांदीचे व्यापारी, सुगंधी द्रव्य तसेच गृहसजावटीच्या वस्तूंचे व्यापारी यांना सप्ताहात मोठा फायदा घेता येईल. खाण्यापिण्याच्या गोष्टी मात्र काटेकोरपणे पाळाव्या लागतील.प्रवासासाठी फार काही चांगला सप्ताह नाही. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्यासमवेत अधिक काळ घालवेल.

तूळ :- स्पर्धात्मक परीक्षेला बसणा-यांनी शांतमनाने सामोरे जावे. परीक्षेच्या भीतीमुळे ग्रासून जाऊ नका. तुमचे प्रयत्न निश्चितपणे सकारात्मक निकाल मिळवून देतील. व्यक्तिमत्त्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. तुमच्या जोडीदाराने दिलेल्या सरप्राईझमुळे तुमचा गेलेला मूड परत येईल.

वृश्चिक :- चार भिंतीबाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षण राहील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. गुंतवणूक करणे टाळा. मुलं आणि कुटुंबावर लक्ष केंद्रित करा. काळजी करू नका, आपले दु:ख बर्फाप्रमाणे वितळून जाईल. जर तुम्ही नवीन व्यावसायिक भागीदारीचा विचार करत असाल, तर कोणताही शब्द देण्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या घटकांची माहिती जमा करा. 

धनु :- निराशाजनक आर्थिक परिस्थितीमुळे काही महत्त्वाच्या कामामध्ये खंड पडू शकतो. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. तुमची कृती प्रेमापोटी असू देत, सकारात्मक दृष्टिकोन बाळगा आणि मत्सर करू नका. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला सप्ताह. निकटच्या सहका-यांशी मतभेद झाल्याने तणावपूर्ण जाईल. नातेवाईक भांडणाचे कारण असू शकेल.

मकर :-  कामाच्या ठिकाणी ज्याचे तुमच्याशी फार जुळत नव्हते, त्या व्यक्तीशी तुमचा सुसंवाद होईल. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील.तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे; परंतु कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. सप्ताह फारसा लाभदायक नाही, त्यामुळे पैशांची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चावर मर्यादा घाला. 

कुंभ :- अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. तुमच्या खेळकर-खोडकर स्वभावामुळे अवतीभवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. नवीन प्रेमप्रकरण घडण्याची दाट शक्यता आहे, पण आपली खासगी आणि गुप्त माहिती तुम्ही उघड करू नका

मीन :- बोलण्यापूर्वी दोन वेळा विचार करा. तुमच्या बोलण्यामुळे अनवधानाने कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातील. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. मुलांसमवेत वेळ घालविणे महत्त्वाचे ठरेल. उग्रपणे वागल्यामुळे तुमच्या नातेसंबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. 

अहमदनगर लाईव्ह 24