Weight Loss : हिवाळ्यात वजन कमी करायचं आहे?, करा ‘हे’ घरगुती उपाय !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weight Loss : नोव्हेंबर महिना संपत आला आहे. हळू-हळू थंडी देखील जाणवू लागली आहे. या मोसमात आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. या ऋतूत भूक जात लागते म्हणूनच लोक अनेक प्रकारचे पदार्थ खातात. याशिवाय ते व्यायामकडे विशेष लक्ष देत नाहीत. अशास्थितीत त्यांना वजन वाढीच्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

वाढत्या वजनामुळे शरीरातील अनेक आजारांचा धोका वाढतो. अशास्थितीत हिव्याच्या दिवसात वजन वाढीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, दरम्यान आज आम्ही तुम्हाला अशा काही घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे वजन नियंत्रणात ठेवू शकता.

वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय !

ग्रीन टी

जर तुम्हाला हिवाळ्यात वजन नियंत्रित करायचे असेल तर ग्रीन टीचे नियमित सेवन करा. कारण ग्रीन टीमध्ये मेटाबॉलिज्म जास्त प्रमाणात आढळते. जे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्याचबरोबर याच्या सेवनाने आरोग्याशी संबंधित इतर आजारांपासूनही आराम मिळतो. लक्षात घ्या ग्रीन टी चे जास्त प्रमाणात सेवन हानिकारक ठरू शकते. म्हणून याचे सेवन प्रमाणात करा.

आवळा रस

हिवाळ्यात आवळ्याचा रस सेवन केल्यास वजन वाढण्याच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. कारण त्यात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. जे तुमचे चयापचय गतिमान करते आणि वजन नियंत्रित करते.

आले पाणी

हिवाळ्यात वजन वाढण्याची समस्या अनेकदा वाढते. अशा परिस्थितीत जर तुम्ही आल्याचे पाणी घेऊ शकता. याच्या सेवनाने तुम्हाला वजन वाढण्याच्या समस्येचा सामना करावा लागत नाही. यासाठी सर्वप्रथम आल्याचे लहान तुकडे करून पाण्यात उकळावे. नंतर त्यात मधही टाकून त्याचे सेवन करा.

संत्र्याचा रस

वजन कमी करण्यासाठी संत्र्याचा रस खूप फायदेशीर ठरतो. त्यात पुरेशा प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी आढळतात. जे वजन नियंत्रित करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

गाजर रस

जर तुम्हाला हिवाळ्यात तंदुरुस्त राहायचे असेल आणि तुमचे वजन नियंत्रित ठेवायचे असेल तर तुम्ही गाजराच्या रसाचे सेवन सुरू करावे. यामध्ये फायबरचे प्रमाण वजन नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.