अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2022 :- ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस या कंपनीने गुंतवणूकदारांना चांगलेच मालामाल केले आहे. या कंपनीच्या शेअरनं १० महिन्यांत ग्राहकांना तब्बल ६५०० टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न्स दिले आहेत.
आयपीओदरम्यान १०२ रूपयांवर हे शेअर्स अलॉट करण्यात आले होते. हा शेअर ७ एप्रिल २०२१ रोजी बीएसई वर १४७ रुपयांच्या जवळ होते.
परंतु १४ फेब्रुवारी २०२२ रोजी या कंपनीचे शेअर्स ९३०० रुपयांवर बंद झाले. कंपनीच्या या शेअरनं १० महिन्यांच्या कालावधीत ग्राहकांना जबरदस्त रिटर्न दिले आहेत.p
जर कोणत्याही व्यक्तीनं ७ एप्रिल २०२१ रोजी यामध्ये १ लाख रुपये गुंतवले असतील तर त्याची किंमत आज जवळपास ६६ लाखांपर्यंत पोहोचली आहे.
या शेअर्सनं गेल्या ६ महिन्यांमध्ये ५०० टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न दिले आहे. कंपनीचा हा शेअर १६ ऑगस्ट रोजी १५६७.०५ रूपयांवर होता.
तोच शेअर आता ९३०० रूपयांवर पोहोचला आहे. तसेच कंपनीचा शेअर १२५९९.९५ रुपयांच्या किंमतीवर ५२ आठवड्यांच्या ऑल टाईम हायवर पोहोचला होता.
तर याचे ऑल टाईम लो १४० रूपये होती. कंपनीचं मार्केट कॅप ६५५४ कोटी रूपयांच्या जवळपास आहे.