Chat GPT म्हणजे काय? ते कसे काम करते? त्याची हिस्ट्री काय आहे? जाणून घ्या Chat GPT By Open AI बाबत संपूर्ण माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Marathi News : जगात नेहमीच नवनवीन तंत्रज्ञान येत असतं. आता नुकतंच Chat GPT आलं आहे. सध्या अनेकांना प्रश्न पडला आहे की, चॅट जीपीटी म्हणजे काय? किंवा ते कसे कार्य करते? याबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतील, कारण सध्या बहुतांश लोकांना याची माहिती नाही. चला याविषयी माहिती जाणून घेऊयात –

Chat GPT काय आहे ?

चॅट जीपीटी हा एक प्रकारचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. चॅट जीपीटी म्हणजे जेनेरेटिव्ह प्री-ट्रेंड ट्रान्सफॉर्मर. त्याच्या साहाय्याने आपण आपल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ शकतो, पण अद्ययावत माहिती मिळवू शकत नाही. कारण त्यात ठरवून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील.

चॅट जीपीटीला आपण चॅटबॉट देखील म्हणू शकतो, कारण जेव्हा आपल्याला कोणत्याही प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे असते तेव्हा आपण तिथे चॅट करतो आणि मग त्याच्या बाजूने उत्तर मिळते. अनेक जण याला सर्च इंजिन म्हणत आहेत, पण त्यांच्याकडे गुगलसारखा रिअल टाइम डेटा नाही.

चॅट जीपीटीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी तेथे चॅट करता तेव्हा आपल्याला ते लगेच उत्तर देते. पण गुगलवर सर्च केल्यावर अनेक वेबसाईट्स आपल्यासमोर येतात, मग आपण त्या वेबसाइट्स उघडतो आणि कोणती माहिती आपल्यासाठी उपयोगी पडते हे पाहतो. आपण आपला वेळ वाचवू इच्छित असल्यास चॅट जीपीटी उत्तम आहे.

* चॅट जीपीटीचा फुल फॉर्म काय आहे?

चॅट जीपीटीचा फुल फॉर्म Chat Generative Pre-Trained Transformer असे आहे. याचे काम तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणे असे आहे. गुगल आणि चॅट जीपीटी मध्ये खूप फरक आहॆ. जेव्हा आपण एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गुगलवर काही शोधतो,

तेव्हा अनेक वेबसाइट्स आपल्यासमोर येतात, मग आपण त्यातील काही साइट उघडतो आणि माहिती मिळवतो. पण या बाबतीत चॅट जीपीटी पूर्णपणे वेगळं आहे, कारण येतेच चॅटिंग करत असल्यासारखं थेट उत्तर यातून मिळतं. यामुळे बराच वेळ वाचतो.

* ChatGPT चा इतिहास काय आहे?

चॅट जीपीटीचा इतिहास रंजक आहे. अमेरिकन प्रोग्रामर सॅम ऑल्टमन यांनी 2015 मध्ये उद्योगपती एलोन मस्कच्या सहकार्याने याची सुरुवात केली होती. पण त्यावेळी ही कंपनी तोट्यात होती. यामुळे इलॉन मस्कने हा प्रकल्प अर्धवट सोडला. त्यानंतर मायक्रोसॉफ्टचे मालक बिल गेट्स यांनी या प्रकल्पात एंट्री केली.

मायक्रोसॉफ्टचे मालक बिल गेट्स यांच्यामुळे, चॅट जीपीटी प्रकल्प पुढे सरकला आणि तो 30 नोव्हेंबर 2022 रोजी लाँच झाला. सॅम ऑल्टमन चॅट GPT बद्दल सांगतात की फार कमी वेळात त्यांचे 2 करोड पेक्षा जास्त युजर्स झाले असून ते झपाट्याने वाढत आहे.

* Chat GPT चा वापर कसा करावा ?

आता तुमच्या मनात प्रश्न येऊ शकतो की, चॅट जीपीटीचा वापर कसा करायचा? तर ती ही माहिती जाणून घेऊयात-

– सर्वप्रथम Chat.openai.com वर जा

– तेथे गेल्यानंतर, तुम्हाला प्रथम तुमचे अकाउंट तयार करावे लागेल.

– तुमचे अकाउंट तयार झाले की लॉग इन करा.

– त्यानंतर तेथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता

– यासाठी तुम्हाला तुमचा प्रश्न खालील चॅट बॉक्समध्ये लिहायचा आहे

– तुमचा प्रश्न लिहिल्यानंतर तुम्हाला एंटर बटण दाबावे लागेल

– तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुमच्या समोर येऊन जाईल