लाईफस्टाईल

BRA चा फुलफॉर्म काय आहे? ब्रा ला हिंदीत काय म्हणतात? वाचा इंटरेस्टिंग माहिती

Published by
Ahmednagarlive24 Office

Marathi News : सोशल मीडियावर रोज कोणत्या ना कोणत्या शब्दाच्या उत्पत्तीविषयी चर्चा सुरू असते. असाच एक वाद क्वोरा नावाच्या प्रसिद्ध अमेरिकन संकेतस्थळावर घडला. कुणीतरी क्वोराला विचारले की ब्रा (BRA) चा फुल फॉर्म काय आहे?

काही लोकांनी ब्रा चा फुल फॉर्म ब्रेस्ट रेस्ट अरेंजमेंट, ब्रेस्ट रेस्ट एरिया असेकाही सांगितले. प्रत्येकाने आपल्या कल्पनेस जमेल तशी उत्तरे दिली. पण ब्राचे फुल फॉर्म कोणालाच बरोबर सांगता आले नाही. प्रश्न पडतो की त्या खरा फुल फॉर्म काय आहे? याला हिंदीत काय म्हणतात? चला याबद्दल जाणून घेऊया.

ब्रा चा फुल फार्म काय आहे ?

ब्रा या शब्दाचा उगम फ्रेंच शब्द brassiere पासून झाला आहे, हा शब्द 1893 मध्ये न्यूयॉर्क टाइम्सच्या इव्हनिंग हेराल्ड या संपादकाने प्रयोग केला होता. DeBevoise नावाच्या कंपनीने 1995 साली आपल्या जाहिरातीत हा शब्द वापरला होता. ब्रॅसीअर हा शब्द मॅगझिन प्रिंटरने छापला होता. त्यानंतर, त्याचा शॉर्टकट फॉर्म सामान्य लोकांसाठी किंवा उत्पादनांसाठी वापरला जाऊ लागला, कारण ज्याप्रमाणे ब्रदर चे शॉर्टकट रूप ब्रो आहे, त्याचप्रमाणे या फ्रेंच शब्द Brassiere चे शॉर्ट फॉर्म ब्रा आहे.

ब्रा ला हिंदीत काय म्हणतात?

ब्रा साठी अचूक हिंदी शब्द नाही. पण भारतात आल्यानंतर लोकांनी त्यांना स्वतःच्या शैलीत हिंदी शब्द दिले, जे खालीलप्रमाणे आहे –

वक्षावृत

वक्षोपवस्त्र

कुच वस्त्र

कुचाग्रनीवी

चोली

कुचबंधन

कंचुकी

यावरून स्पष्टपणे दिसून येते की ब्रा साठी कोणतेही एक असे हिंदी नाव नाही, उलट ते भारतात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.

Ahmednagarlive24 Office