सोने खरेदीसाठी योग्य वेळ कोणती?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपासून सोने दरात सतत घसरण होत आहे. आता सोने दरात (Gold price Today) घसरण झाल्याचा फायदा घेता येऊ शकतो.

सध्या सोन्यात गुंतवणूक करुन किंवा दागिने खरेदी करुन चांगला नफा कमवता येऊ शकतो. यावेळी लग्नसमारंभासाठी दागिने खरेदी करत असाल, तर स्वस्तात सोनं खरेदीची संधी आहे.

आज रविवारी मल्टी कमॉडिटी मार्केट (MCX) बंद आहे. मागील सत्रात सोने दर 318 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या घसरणीसह 48,880 रुपयांवर क्लोज झाला होता.

तर, मागील सत्रात चांदीचा जुलै फ्यूचर ट्रेड 217.00 रुपयांच्या तेजीसह 72,328.00 रुपयांवर क्लोज झाला होता.

मनी कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचे दर कंसोलिडेशनच्या काळातून जात असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.

बुलियन एक्सपर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही घसरणीमध्ये सोन्यात गुंतवणूक करावी. डिसेंबर 2021 च्या अखेरीस सोने दर 53,500 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहचू शकतात.

अहमदनगर लाईव्ह 24