लग्न असो किंवा स्त्री-पुरुषांमधील रिलेशनशिप असो यामध्ये दोघांच्या आवडीनिवडी असतात व या आवडीनिवडी ओळखून व त्या सांभाळूनच पुरुष व स्त्री एकमेकांच्या रिलेशनशिपमध्ये येत असतात किंवा आयुष्याचा जोडीदार म्हणून एकमेकांची निवड करत असतात.
प्रत्येकाच्या एकमेकांबद्दल काही अपेक्षा असतात. मग त्या बाह्य व्यक्तिमत्त्वाबद्दल असतात तसेच नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत देखील असतात. यामध्ये वेगवेगळ्या महिलांचे पुरुषांबद्दल वेगवेगळे मते असू शकतात.
तसेच पुरुषांचे देखील महिलांबद्दल वेगवेगळी मते असू शकतात. परंतु बऱ्याचदा महिलांच्या बाबतीत विचार केला तर महिलांना कशा प्रकारचे पुरुष आवडतात किंवा त्या कोणत्या प्रकारच्या पुरुषांकडे जास्त आकर्षित होतात?
देखील प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात येत असेल. हेच प्रश्न काही संशोधनांचा विषय देखील आहे. त्यामुळे डेटिंग वरील अलीकडेच करण्यात आलेल्या संशोधनांमधून स्त्री नेमक्या कोणत्या प्रकारच्या पुरुषांना प्राधान्य देतात किंवा त्यांच्याकडे आकर्षित होतात.
तसेच विवाह सारख्या दीर्घकालीन नातेसंबंधांसाठी कशा प्रकारच्या पुरुषांचा विचार करतात? याबाबतीत संशोधन करण्यात आले असून त्याबाबतची माहिती या लेखात आपण घेणार आहोत.
महिला कशा प्रकारच्या पुरुषांकडे होतात आकर्षित?
पर्सनल रिलेशनशिप्स मध्ये एक अभ्यास निष्कर्ष प्रकाशित झालेले असून त्यानुसार पाहिले तर दीर्घ संबंधांमध्ये यश तेव्हा मिळते जेव्हा आपल्या जोडीदाराची विनोद बुद्धी चांगली असते. यासोबतच अमेरिकेतील आर्कान्सास विद्यापीठातील फुल ब्राईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्सचे मानसशास्त्राचे प्राध्यापक मीच ब्राऊन यांनी म्हटले की,
आमच्या डेटा वरून असे दिसते की स्त्रिया त्यांच्या आवडीनुसार शक्तिशाली तसेच आनंदी पुरुषाची निवड करतात तर थोड्या कालावधी करिता नातेसंबंध बनवायचे असतील तर महिला मजबूत पुरुषांना प्राधान्य देताना दिसून येतात.
तसेच एखाद्या स्त्रीला पुरुषासोबत शारीरिक दृष्ट्या सुरक्षित वाटते एवढेच नाही तर तिला भावनिक आणि अध्यात्मिक सुरक्षितता देखील पाहिजे असते. याबाबतीत मानसशास्त्रज्ञांच्या मते बरेच पुरुष हे आकर्षण, भौतिक वाद आणि सेक्स यावर जास्त लक्ष केंद्रित करत असतात.
कशा पद्धतीने केला गेला हा अभ्यास?
या प्रकारचा अभ्यास करण्यासाठी भिन्न आणि उभयलिंगी ओळख असलेल्या महिलांना एका विद्यापीठांमध्ये समाविष्ट केले गेले व 394 महिलांच्या माध्यमातून याबाबत प्रश्न उत्तरे विचारण्यात आली.
यातील महिलांनी शारीरिक दृष्ट्या मजबूत आणि मानसिक गुण चांगले असलेल्या जोडीदाराच्या गरजेबाबत स्वतःचे मत व्यक्त केले. यावरून दिसून आले की स्त्रियांना असा जोडीदार निवडायचा असतो जो शारीरिक दृष्ट्या आकर्षक असेल व वर्तुणुकीशी सकारात्मक गुण असलेला असेल.
परंतु यामध्ये काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. जसे की काही काही महिलांचे शारीरिक ताकद आणि विनोदाबाबत मते भिन्न असल्याचे दिसून आले. या संशोधनामध्ये ज्या महिलांचा सहभाग होता त्यामध्ये अनेक वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी त्यांच्याकडून सांगण्यात आल्या. यावरून आपल्याला दिसते की महिलांना एकाच स्वभावाचे पुरुष आवडत नसून त्यांना वेगवेगळ्या स्वभावाचे पुरुष आवडत असतात.