अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- 9.43 PM सध्या गेल्या अर्ध्यातासापासून Whatsapp Facebook आणि Instagram भारतातील लाखो वापरकर्त्यांसाठी बंद झाले आहे. हे तीनही Apps लोड करण्यात अयशस्वी होत असून आणि भारतासह विविध देशांमध्ये ही समस्या जाणवत आहे. (Whatsapp Facebook and Instagram down)
व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुक भारतात आणि जगभरात अचानक डाऊन झाल्याने गोंधळ उडाला असून व्हॉट्सअॅपवर मेसेज करण्यात बऱ्याच युजर्सना अडचणी येत आहेत.
फेसबुकनं दिलेय हे स्पष्टीकरण
फेसबुकने आपल्या वेबसाईटवर मॅसेज लिहीत दिलगिरी व्यक्त केली आहे. “माफ करा, काहीतरी चुकीचं झालं आहे. आम्ही गुंता सोडवण्याचं काम करत आहोत. लवकरच सर्व काही सुरळीत होईल”, असं फेसबुकनं आपल्या मॅसेजमध्ये लिहीलं आहे.
Whatsapp कडून आलेले आताचे स्पष्टीकरण
याबाबत Whatsapp च्या अधिकृत Twitter अकाउंट वरून माहिती देण्यात आली आहे त्या त्यांनी सांगितले आहे कि
आम्हाला माहिती आहे की काही लोकांना सध्या व्हॉट्सअॅपमध्ये समस्या येत आहेत. आम्ही गोष्टी पुन्हा सामान्य करण्यासाठी काम करत आहोत आणि शक्य तितक्या लवकर येथे अपडेट पाठवू.
Whatsapp चे सर्व्हर बंद पडले !
व्हॉट्सअॅपचे सर्व्हर बंद पडले आहे. सर्व्हर बंद पडल्यामुळे सगळ्या सुविधा बंद झाल्या आहेत. मेसेजिंग, व्हिडीओ कॉल, ग्रूप चॅट, ही सर्व फिचर्स सध्या बंद पडली आहेत. हा प्रकार साधारणपणे मागील वीस मिनिटांपासून जाणवत आहे.
Whatsapp Facebook and Instagram वापरताना एरर !
फेसबुक, व्हॉटसअॅप वापरताना सतत एरर येत आहेत. यावेळी युजर्सना Can’t access your Facebook feed today? Instagram photos won’t reload? Whatsapp messages not going through? असे नोटिफिकेशनही दिसत आहे.
ट्विटरवर मीम्स व्हायरल
फेसबुक, इन्स्टा डाऊन झाल्यानंतर ट्विटरवर मीम्स व्हायरल झाले आहेत. यामध्ये पुन्हा एकदा ही अॅप्स डाऊन झाल्यानं ट्विटर युजर्सनी खिल्ली उडवणारे मीम्स शेअर केले आहेत. यात ट्विटर युजर्सना आनंद झाल्याचं सांगणारे ट्विटही आहेत.
या आधीही झाले होते Down
याआधी 20 मार्चला जगभरात फेसबुक, व्हॉटसअॅप आणि इन्स्टाग्राम ४२ मिनिटांसाठी डाऊन झालं होतं. युजर्सना ही अॅप्स वापरता आली नव्हतीत. फेसबुकच्या मेसेंजर सर्विसमध्येही एरर येत होते.
एकाच वेळी तीनही App Down !
हे तीनही Apps Down झाले आहेत या लोकप्रिय तिन्ही सोशल मीडियाची मालकी फेसबुककडे आहे.मेसेज पाठवणे किंवा फोटो शेअर करणे आणि सोशल नेटवर्किंगच्या बाबतीत जागतिक बाजारपेठेत पूर्णपाने याच ३ Apps चे वर्चस्व आहे.
भारत आहे सर्वात मोठी बाजारपेठ
भारतात फेसबुकचे ४१० दशलक्षाहून अधिक, व्हॉट्सअॅपचे ५३० दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत. इन्स्टाग्रामचे भारतात २१० दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत. या तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी भारत मोठी बाजारपेठ आहे.