अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :-मेसेंजर अॅप व्हॉट्सअॅप असे एक अॅप आहे जे सर्व काम मिनिटभरात करते. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून व्हिडिओ चॅटपासून होम शॉपिंग लिस्टपर्यंत आणि ऑफिसशी संबंधित गोष्टी, या अॅपद्वारे एकमेकांशी शेअर करतो.
यासाठी आपले व्हॉट्सअॅप अकाउंट सुरक्षित ठेवणे फार महत्वाचे आहे. यासाठी यात आधीपासूनच टू स्टेप वेरिफिकेशन हे फिचर आहे.
हे फिचर अनेबल केल्यास व्हॉट्सअॅपवर प्रवेश करण्यासाठी त्यांच्या कनेक्ट केलेल्या मोबाइल नंबरवर OTP येईल. त्याद्वारे तुम्ही ते ओपन करू शकता. हे ऑप्शनल फीचर आहे.
हे फीचर सुरु केल्यानंतर तुमचा नंबर व्हेरिफाय करण्यासोबतच तुम्हाला ६ अंकी पासवर्ड निवडावा लागेल. हा पासवर्ड एंटर केल्याशिवाय तुम्ही नव्या फोनवर व्हॉट्सअॅप नंबर अॅक्टिव्हेट करु शकत नाही.
यासाठी या आहेत स्टेप्स – Settings > Account > Two-step verification > Enable. फीचर ऑन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल अॅड्रेस टाकण्याचा पर्याय दिसेल.
जर तुम्ही पासवर्ड विसरलात तर व्हॉट्सअॅप तुम्हाला या ईमेलवर लिंक पाठवले ज्यावर क्लिक करुन तुम्ही टू-स्टेप व्हेरिफिकेशन फीचर ऑफ करु शकता.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com