जगातील सर्वात जास्त धबधबे कोणत्या देशात आहेत ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जी-२० देशांच्या परिषदेपासून भारत आणि कॅनडा या देशांमध्ये कटुता निर्माण झाली आहे. त्यामुळे कॅनडा या देशाची सध्या चर्चा होत आहे. राजकारणाचा भाग सोडला आणि कॅनडाबद्दल जर जाणून घ्यायचे ठरवले तर हा देश अनेक कारणांमुळे जगातील एक वैशिष्ट्यपूर्ण देश आहे. या देशात जगातील सर्वाधिक धबधबे आहेत.

खरंतर भारत आणि कॅनडा या दोन देशांमध्ये फार पूर्वीपासून जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. विशेषतः पंजाब आणि हरयाणामधील बहुतांश तरुण कॅनडामध्ये वास्तव्य करून आहेत. किंवा कॅनडामध्ये वास्तव्य करण्याचे स्वप्न बाळगून आहेत.

कॅनडा या देशाबद्दल सांगायचे तर हा देश जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे. हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. कॅनडा या देशाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या देशातील लोक जगातील सर्वात जास्त डोनटस् खाणारे लोक आहेत. कॅनडातील ३ कोटी लोक दरवर्षी सुमारे एक अब्ज डोनटस् फस्त करतात.

या व्यतिरिक्त या देशात जगातील कोणत्याही अन्य देशांपेक्षा जास्त जलाशय आहेत. कॅनडातील ग्रेट व्हाईट नार्थमध्येच तब्बल ५६३ जलाशय आहेत. जगातील अन्य कोणत्याही देशाच्या तुलनेत कॅनडामध्ये सर्वाधिक लांबीची कोस्टल लाइन आहे. या कारणामुळे या देशात फिशिंग, व्हेल वॉचिंग, स्विमिंग आणि बोटिंग प्रचंड लोकप्रिय आहे.

आपल्याकडे जसे कुक्कुटपालन, वराहपालन, शेळीपालन, मधमाशीपालन यांसारखे शेतीपूरक उद्योग केले जातात, त्याच धर्तीवर कॅनडामध्ये चक्क सर्पपालन केले जाते.