लाईफस्टाईल

गॅलब्लॅडर स्टोनचा धोका सर्वाधिक कोणाला आहे ?

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- गॅलब्लॅडर मध्ये स्टोनची समस्या सामान्य आहे. पण काही व्यक्तींमध्ये याची शक्‍यता खूप अधिक असते. म्हणून अशा लोकांना सर्वाधिक सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असते…

पस्तीस वर्षाच्या एका महिलेच्या पोटात तीव्र वेदना होत होत्या. वेदना खांदे आणि पोटातही जाणवत होत्या. त्याचबरोबर उलट्या होत. सुरुवातीच्या औषधांमुळे आराम न मिळाल्याने जेव्हा ती दवाखान्यात आली, तेव्हा तिच्या पोटाच्या सोनोग्राफीमध्ये गॉलब्लेडर स्टोन असल्याचे समजले.

सुरुवातीच्या इलाजानंतर गॉलब्लेडरला लेप्रोस्कोपी सर्जरीद्वारे काढून टाकण्यात आले. आता ती पूर्णपणे निरोगी आहे. गॉलब्लेडर म्हणजे पित्ताशय पोटातील लिव्हरशी संबंधित एक छोटासा पुरचुंडी समान अवयव असतो. जेथून पित्त आतड्या पर्यंत पोहचते.

म्हणून बोलीभाषेत पित्ताची पिशवी असे देखील म्हटले जाते. पित्त म्हणजे बाइल लिव्हरद्वारे होणारा स्राव एक पाचक स्त्राव असून त्याचा पचन यंत्रणेत महत्त्वाचा वाटा असतो. गाल ब्लॅडर मध्ये हेच बाइल जमा होते. कधी कधी या द्रवात असणारे अधिक कोलेस्ट्रॉल किंवा बाइल पिग्मेंटच्या आधिक्यामुळे गॉलब्लेडरमध्ये स्टोनची निर्मिती होते.

हे स्टोन छोट्या मटारच्या दाण्यापासून ते गोल्फ बॉल एवढे मोठेही असू शकतात आणि कधी कधी एकापेक्षा जास्त बनू शकतात.

» कधी असतो जास्त धोका ?

जर कुटुंबात आधीपासून कोणाला ही समस्या असेल, तर इतर सदस्यांना ही समस्या होण्याची शक्‍यता अधिक असते.

महिलांमध्ये, विशेषत: चाळिशी पार केलेल्या महिलांना ही समस्या होण्याची शक्‍यता अधिक असते.

ज्या व्यक्‍ती नियमितपणे अधिक फॅट्सयुक्‍त आहाराचं सेवन करतात त्यांच्या शरीरात गॉलब्लेडर स्टोनची शक्‍यता सर्वाधिक असते.

गरोदरपणाच्या दरम्यान किंवा गर्भनिर्धारणासाठी हार्मोनल टॅबलेट्स घेण्याने ही समस्या होण्याची शक्‍यता वाढते.

या व्यक्‍तीशिवाय ज्या व्यक्‍ती सतत उपवास करतात किंवा वेगाने वजन कमी करण्यासाठी सप्लीमेंट्सची मदत घेतात, यांना ही समस्या होण्याची शक्‍यता अधिक असते. काही जन्मजात रक्‍ताशी संबंधित आजार म्हणजे सिकल सेल अनिमियामुळेही मुलांना गॉलब्लेडर स्टोनची समस्या होते.

गॉलब्लेडरमध्ये जमा स्टोन, बाइलच्या नळीला अवरोध करू कावीळ, पोटात तीव्र वेदना अशी लक्षणं निर्माण करतो. या स्टोनमुळे गॉल ब्लेडर आणि पॅनक्रियाजमध्येही संसर्ग होतो. अशा स्थितीत उपचार करणे आवश्यक आहे.

» बचाव कसा कराल ? : – ही समस्या होऊच नये यासाठी संतुलित आहाराचं सेवन करा. जीवनशैलीत व्यायामाचा समावेश करा. कोलेस्ट्रॉल वाढणार नाही याची काळजी घ्या. तसंच वेगाने वजन कमी करू नका. उपवासही सतत करू नका. जर स्टोनचा कुटुंबात इतिहास असेल तर गर्भनिरोधक गोळ्यांच्या ऐवजी अन्य उपाय आजमावून बघा.

» स्टोन काढावा की नाही ? : – बहुतांश स्टोन कोणत्याही लक्षणाशिवाय किवा नुकसान न पोहचवता गालब्लेडर मध्ये पडलेले असतात. कधी कधी तर व्यक्‍तीला आजीवन हेच समजत नाही की, त्याच्या गॉलब्लेडरमध्ये स्टोन आहे. गॉलब्लेडर स्टोन विरघळण्यासाठी किंवा नाहिसे होण्यासाठी कोणतंच औषध नाही.

याचा एकमेव इलाज म्हणजे गॉलब्लेडरमधून काढून टाकणे. यामुळे रुणाचे कोणतेही नुकसान होत नाही. कारण गालब्लेडर हे आवश्यक अंग नाही. पण अर्थातच याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. गॉलब्लेडर काढायचा की नाही, यासाठी चांगल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. या स्थितीत डॉक्टर गालब्लेडर काढण्याचा निर्णय घेतात…

१. जर मधुमेहींना गॉलब्लेडर स्टोन झाला असेल. अशा व्यक्तींमध्ये स्टोनमुळे संसर्ग आणि जटिलता वाढण्याची शक्‍यता अधिक असते.

२. जर गरोदरपण किंवा लग्नाआधी मुलींमध्ये गॉलब्लेडर स्टोन सापडल्यास गॉलब्लेडरला काढून टाकणे फायदेशीर ठरते. कारण गॉलब्लेडर स्टोन असताना गर्भधारणा सुरक्षित मानली जात नाही.

३. जर एखाद्या व्यक्‍तीच्या गॉलब्लेडरमध्ये छोटे छोटे अनेक स्टोन असतील तर अशा रुग्णांमध्ये गुंतागुंत होण्याची शक्‍यता अधिक असते.

४. जर एखाद्या आजारामुळे पोटाची शस्त्रक्रिया करावी लागली, तर मुख्य शस्त्रक्रियेबरोबर गॉलब्लेडर काढून टाकले जाते.

५. जर गॉलब्लेडरमुळे काही समस्या, वेदना, उलट्या होत असतील तर ते काढले जाते.

Ahmednagarlive24 Office