World First Mobile : जगातील पहिला फोन कोणी बनविला ? चार्जिंग करण्यासाठी किती वेळ लागायचा ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

World First Mobile : १८७० मध्ये अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी पहिल्यांदा टेलिफोनचा शोध लावला होता. नंतर १८९० मध्ये गुल्येल्मो मार्कोनी वायरलेस तंत्रज्ञानाची तत्त्वे मांडली. हे तंत्रज्ञान समोर आल्यानंतर अनेक अभियंते आणि शास्त्रज्ञांनी या क्षेत्रात काम केले.

या क्षेत्रात काम करणारे काही विद्वान असे उपकरण बनवण्याचा प्रयत्न करत होते. ज्यामुळे कोणत्याही वायरच्या मदतीशिवाय दूरच्या लोकांमध्ये संभाषण शक्य होईल. मार्टिन कूपर हे वायरलेस तंत्रज्ञानामध्ये स्वारस्य असलेले एक व्यक्ती होते आणि १९७० मध्ये मोटोरोला कंपनीत अभियंता म्हणून रुजू झाले.

१९७३ मध्ये मार्टिन कूपरने जगातील पहिल्या मोबाईल फोनचा शोध लावला आणि हा मोबाईल मोटोरोला कंपनीचा होता. मार्टिन कूपर यांचा जन्म १९२८ मध्ये शिकागो येथे झाला. जगातील पहिला मोबाईल फोन मोटोरोला कंपनीचा डायना टॅक हा होता.

त्याचे वजन १.१ किलो ग्रॅम आणि आकार ९ इंच होता. मार्टिन कूपरने शोधून काढलेल्या या फोनवर सुमारे दहा वर्षे काम करण्यात आले आणि यासोबतच सेल्युलर नेटवर्क सुधारण्यावरही काम करण्यात आले. यानंतर, पहिला व्यावसायिक सेल्युलर पोर्टेबल फोनला २१ सप्टेंबर १९८३ रोजी मान्यता दिली.

डायना टॅक ८००० एक्सला वर अमेरिकेच्या एफसीसीने मान्यता दिली. डायना टॅक ही मोटोरोलाने बनवलेल्या सेल्युलर टेलिफोनची मालिका होती. तो १० तासांत पूर्णपणे चार्ज व्हायचा आणि ३० मिनिटांचा टॉकटाइम.

यात नंबर डायल करण्यासाठी एलईडी डिस्प्ले होता आणि ३० संपर्क क्रमांक संग्रहित करण्यात सक्षम होता. डायना टँक हे ‘डायनॅमिक अॅडाप्टिव्ह टोटल एरिया कव्हरेज’चे संक्षिप्त रूप होते. शिकागो येथे १९४६ मध्ये कारच्या रेडिओ टेलिफोनवर पहिला मोबाईल कॉल करण्यात आला होता.