GK General Knowledge : जगाची उत्पत्ती कुठून झाली इथपासून या पृथ्वीवरील सर्वात पहिला सजीव कोण होता इथपर्यंतची अनेक निरीक्षणे, अनेक अभ्यास आतापर्यंत केले गेले. जगभरातील वैज्ञानिकांनी, संशोधकांनी आणि अभ्यासकांनी आपापल्या परीने या संशोधनामध्ये योगदान दिले आहे.
अनेक वर्षांची मेहनत, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अध्ययनातून पृथ्वीवरील जीवसृष्टीबाबत अनेक गोष्टी आजवर आपल्याला ज्ञात झाल्या आहेत. याच दिशेने आणखी एक धागा नुकताच शास्त्रज्ञांच्या हाती लागला आहे. या संशोधनामुळे पृथ्वीवरील सर्वात प्राचीन जीवसृष्टीचा अवशेष हाती लागल्याला दावा करण्यात येत आहे.
शास्त्रज्ञांना ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागात एक असा प्राचीन खडक सापडला आहे की, ज्यामुळे पृथ्वीवर जीवसृष्टी कशी निर्माण झाली याची माहिती मिळू शकेल, असा विश्वास शास्त्रज्ञांन वाटत आहे. या खडकामुळे मानवाच्या उत्क्रांती प्रक्रियेतील त्याच्या पहिल्यावहिल्या पूर्वजांबद्दलची माहिती मिळू शकेल, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
शास्त्रज्ञांनी या खडकाच्या निरीक्षणादरम्यान अशा काही सूक्ष्मजीवांचे अवशेष सापडले आहेत की, जे सुमारे १६ अब्ज वर्षांपूर्वीचे असावेत, असा अंदाज आहे. १६ अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवरील जलस्त्रोतांमध्ये या जीवांचे वास्तव्य होते.
आधुनिक काळातील या सूक्ष्म जीवांच्या रुपांबद्दल सांगायचे तर, यामध्ये रोपे, प्राणी, एकपेशीय सूक्ष्मजीव (अमिबा ) आणि बुरशीचा समावेश होतो. नव्याने झालेल्या संशोधनातून समोर आलेले संदर्भ पाहता हे सूक्ष्मजीव पृथ्वीवरील सर्वात जुन्या जीवसृष्टीचा भाग असून,
कालगणनाही सुरू झाली नव्हती तेव्हापासून त्यांचे अस्तित्व असावे. सुमारे १० वर्षांच्या संशोधनानंतर या जीवांची सविस्तर माहिती आणि अहवाल जगापुढे आणण्यात आला.