विमानाच्या इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात? अंधश्रद्धा की लॉजिक ? जाणून घ्या इंटरेस्टिंग फॅक्ट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Marathi News : विमानाबाबत सर्वानाच अप्रूप वाटत. आकाशातून विमान जाताना पाहिलं तरी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत आकाशाकडे पाहतात. ते डोक्यावरून दिसेनासे होईपर्यंत त्याकडे पहिले जाते. आपल्यातील काहींनी विमान प्रवास देखील केला असेल.

परंतु विमानाबाबत अनेक इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. ज्या समोर आल्या की अरे हे काय लॉजिक आहे ? असा प्रश्न पडतो. त्यातीलच एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे विमानाच्या इंजिनावर कोंबड्या फेकणे ! ऐकून विचित्र वाटेल पण अनेकांना हा प्रश्न पडलेला आहे की, विमानाच्या इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?

चला जाणून घेऊ यामागचं कारण… विमानाच्या इंजिनवर मृत कोंबड्या फेकण्यामागे एक खास कारण असते. असे केले जाते जेणेकरून विमानाच्या इंजिनची चाचणी घेता येईल. आपण अनेकदा ऐकले असेल की एखादा पक्षी विमानाच्या उडत्या पंखांवर आदळून काही अपघात होतात. अशा विमान दुर्घटनेमुळे हजारो प्रवाशांना आपला जीवही गमवावा लागू शकतो. हे टाळण्यासाठी इंजिन टेस्ट केली जाते.

* कधी नकली तर कधी मेलेल्या कोंबड्यांचा वापर

एव्हिएशन एक्सपर्टच्या मते, जेव्हा जेव्हा एखादे विमान आकाशात उडत असते, तेव्हा एखादा पक्षी येऊन आदळण्याची भीती नेहमीच असते. त्यामुळे विमानाचे नुकसान होण्याची भीती असते. अशा वेळी विमान निर्माता कंपन्या कोंबड्या इंजिनावर फेकून टेस्ट करतात. याला “बर्ड कॅनन” असं म्हणतात. अनेकदा यासाठी नकली पक्षीही वापरले जातात किंवा मेलेल्या कोंबड्या देखील वापरल्या जातात.

* असा झाला पहिला प्रयोग हे प्रयोग

अनेक वर्षांपासून केले जात आहेत. सर्वप्रथम १९५० मध्ये हर्टफोर्डशायर येथील डी हॅव्हिलँड एअरक्राफ्टमध्ये केले. या कामात मृत कोंबड्यांचा वापर केला जातो आणि इंजिनला आग लागत तर नाहीना हे पहिले जाते.

त्यावेळी हा प्रयोग करण्यासाठी इंजिनवर कोंबडी फेकण्यात आली होती. पण आजकाल असं फार कमी केलं जातं. आता इंजिन टेस्ट करण्याच्या इतरही आधुनिक पद्धती वापरल्या जातात.