Black Thread : अनेकदा आपण पाहतो, महिला किंवा पुरुष आपल्या पायात कला धागा बांधतात. काळा धागा फक्त सामान्य लोकच बांधत नाहीत तर अगदी बॉलिवूड सेलिब्रिटी देखील आपल्या पायात धागा बांधताना दिसतात.
काळा धागा वाईट नजर टाळण्यासाठी घातला जातो. यामुळे नकारात्मक शक्ती दूर राहते. परंतु, काही लोक असे आहेत जे फॅशन म्हणून काळा धागा बांधकात. तर काही लोक दुसऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून काळा धागा बांधतात. पण तुम्हाला माहिती आहे का काळा धागा बांधण्याचे अनेक फायदे आहेत.
आजच्या लेखात आम्ही तुम्हाला पायावर काळा धागा बांधण्याचे काही चमत्कारी फायदे सांगणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने जीवनात मोठा बदल दिसून येतात. चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
पायात काळा धागा बांधण्याचे फायदे :-
-वास्तुशास्त्रानुसार पायाच्या बोटावर काळा धागा बांधल्याने आरोग्य चांगले राहते. म्हणूनच तुम्ही लोकांना पायात काळा धागा बांधताना पाहिलं असेल.
-वास्तुशास्त्रानुसार मंगळवार आणि शनिवारी काळा धागा धारण करणे शुभ मानले जाते. यामुळे देवी लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर राहते. यासोबतच प्रभू श्री रामाचे भक्त हनुमान आणि शनिदेवही आपला आशीर्वाद कायम ठेवतात.
-वास्तुशास्त्रानुसार पायावर काळे धागा बांधल्याने कोणाचीही वाईट नजर रोखली जाते. अशास्थितीत जन्मानंतर, मुलांना इजा होऊ नये म्हणून त्यांना काळा धागा देखील बांधला जातो.
-स्त्रियांनी नेहमी डाव्या पायावर काळा धागा बांधला पाहिजे, तर पुरुषांनी उजव्या पायावर काळा धागा बांधावा, असा उल्लेख वास्तुशास्त्रात आहे. यामुळे सर्व दोष दूर होतात आणि तुम्ही आनंदी जीवन जगू शकता.