लाईफस्टाईल

Winter Diet : हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी ‘या’ पदार्थांचे करा सेवन ! रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याबरोबरच होतील अनेक फायदे !

Published by
Renuka Pawar

Winter Diet : हलक्या पावसांनंतर सर्वत्र थंड वारे वाहू लागले आहे. वातावरणातला गारवा वाढला आहे. या हवामानात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण या मोसमात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्यामुळे, लवकर आजारी पडण्याची शक्यता असते. वातावरणात गारवा असल्यामुळे सर्दी आणि खोकला यांसारख्या समस्या जाणवू लागतात. म्हणूनच या मोसमात आहाराची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.

अशा परिस्थितीत हिवाळ्यात कोणते हेल्दी स्नॅक्स खावेत, ज्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक घटक आढळतात, त्याबद्दल आज आम्ही सांगणार आहोत. चला तर मग…

बदाम आणि अक्रोड

हिवाळ्यात तुम्ही बदाम आणि अक्रोडात मनुका आणि पिस्ते मिसळून हेल्दी ड्रायफ्रूट मिक्स तयार करू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यामध्ये बदाम भाजून घेऊ शकता. ड्राय फ्रूट थंड वातावरणात तुमच्या शरीराला ऊर्जा देतात. सुका मेवा हे निरोगी चरबी, प्रथिने आणि आवश्यक जीवनसत्त्वे यांचा चांगला स्रोत आहे. म्हणूनच हिवाळयात याचा समावेश केला पाहिजे.

शेंगदाणे

हिवाळ्यात, तुम्हाला जवळपास प्रत्येक चौकात आणि बाजारपेठेत गाड्यांवर भाजलेले शेंगदाणे सापडतील. संध्याकाळी स्नॅक्स म्हणून तुम्ही भाजलेले शेंगदाणे खाऊ शकता. शेंगदाणे उष्ण स्वभावाचे असतात, त्यामुळे त्यांचे सेवन केल्याने थंड वातावरणात तुमचे शरीर आतून उबदार राहते. हेल्दी फॅट्ससोबतच शेंगदाण्यामध्ये लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फोलेटसह अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात.

माखणा

हिवाळ्यात हेल्दी स्नॅक्ससाठी मखना हा एक चांगला पर्याय आहे, तुम्ही तो तुपात भाजूनही घरी बनवू शकता. पोषक तत्वांनी भरपूर असलेले माखणा कोणत्याही ऋतूत खाऊ शकतो.

केळी चिप्स

हिवाळ्यात संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी केळीच्या चिप्स हा एक चांगला पर्याय आहे. केळीच्या चिप्सचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते, फायबर युक्त केळी चिप्स ऊर्जा वाढवतात. केळीच्या चिप्स तुम्ही घरी सहज बनवू शकता. केळीच्या चिप्स हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar