Winter diet : हिवाळ्यात होणाऱ्या आजारांपासून लांब राहण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Winter diet : हळू-हळू थंडी वाढू लागली आहे. हिवाळ्याच्या दिवसात आरोग्याची विशेष काळजी घेणे फार महत्वाचे आहे. कारण, यादिवसांत रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, त्यामुळे आपण लवकर आजरी पडतो, म्हणूनच या काळात अशा पदार्थांचे सेवन केले पाहिजे जे तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करतील तसेच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतील.

हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात सर्दी, ताप, खोकला आदी समस्या वाढतात. अशा परिस्थितीत असे काही पदार्थ आहेत ज्यांच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते. जे तुम्हाला लवकर आजारी पडण्यापासून वाचवते. आणि शरीराला आतून उबदार ठेवण्यास देखील मदत करते.

गुळाचे सेवन

गुळाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. हिवाळ्यात याचे सेवन केल्याने तुम्हाला फिट राहण्यास मदत होते. त्याचबरोबर हिवाळ्यात शरीराला उबदारपणा जाणवतो.

गाजर

हिवाळ्यात गाजराचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असते. याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. जे हिवाळ्यात आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन ए, ई, पोटॅशियम सारखे रासायनिक घटक शरीरासाठी फायदेशीर असतात.

बदाम

बदामाचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. थंडीच्या काळात शरीराला उबदार ठेवण्यासाठी बदाम फायदेशीर ठरतात. तसेच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.

तुपाचे सेवन

हिवाळ्यात तुपाचे सेवन आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असते. याचे सेवन केल्याने तुम्हाला आतून उबदार वाटते. याशिवाय, ते शरीराला कोरडे होण्यापासून आणि त्वचेला तडे जाण्यापासून वाचवते.

मसाल्यांचा वापर

घरांमध्ये वर्षभर मसाले वापरले जातात. त्यामुळे जेवणाची चव वाढते. त्याच वेळी, हिवाळ्याच्या हंगामात ते अधिक फायदेशीर आहे. याच्या सेवनाने शरीर उबदार राहण्यास मदत होते.