लाईफस्टाईल

Winter superfoods : बदलत्या ऋतूंमध्ये निरोगी राहण्यासाठी आहारात करा ‘या’ 5 सुपरफूडचा समावेश !

Published by
Ahmednagarlive24 Office

Winter superfoods : हिवाळ्याला सुरुवात झाली आहे. हळू-हळू वातावरणातील थंडी देखील वाढत आहे. अशास्थितीत आरोग्याची विशेष काळजी घेणे फार गरजेचे आहे. कारण या दिवसात लोक लवकर आजारी पडू लागतात. म्हणूनच आपण आहारात अशाकाही पदार्थांचा समावेश केला पाहिजे, ज्यामुळे थंडीमध्ये आपले शरीर उबदार राहील आणि आपण लवकर आजारी देखील पडणार नाही.

बदलत्या ऋतूमध्ये आपण आपल्या आहारात काही सुपरफूड्सचा समावेश केला पाहिजे. ज्याचा सेवनाने शरीराला अधिक फायदे होतील, आज आपण अशाच पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत, चला तर मग…

निरोगी राहण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश !

आवळा

आवळ्याला व्हिटॅमिन सी चे पॉवर हाऊस म्हणून ओळखले जाते. आवळा बदलत्या ऋतूंमध्ये आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि यासोबतच आवळा खाल्ल्याने त्वचा, केस आणि नखेही सुधारतात.

हिवाळ्यात आवळा अनेक प्रकारे खाल्ला जाऊ शकतो. आवळ्याचा च्यवनप्राशही घेऊ शकता. हिवाळ्यात च्यवनप्राश सेवन करणे फायदेशीर आहे, हे लक्षात ठेवा की, तुम्ही चांगल्या प्रतीचा च्यवनप्राश घ्यावा, यासाठी तुम्ही आयुर्वेदाचार्यांचा सल्ला देखील घेऊ शकता.

चिया सीड्स

चिया सीड्सचा सुपरफूडच्या यादीत समावेश होतो, चिया सीड्स ओमेगा ३ फॅटी ऍसिडचा चांगला स्रोत आहे, यासोबतच चिया सीड्समध्ये फायबर आणि प्रोटीनचे प्रमाणही चांगले असते. अशा परिस्थितीत, बदलत्या ऋतूमध्ये चिया बियांचे सेवन केल्याने तुमचे आरोग्य सुधारेल.

हळद

हळदीच्या फायद्यांबद्दल सर्वांनाच माहिती आहे आणि भारतीय जेवणात तिचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. हळदीमध्ये कर्क्यूमिन असते, ज्यामध्ये दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. हळदीचा वापर भाज्या बनवण्यापासून ते लोणचे बनवण्यापर्यंत सर्व गोष्टींमध्ये होतो, पण हिवाळ्यात तुम्ही रात्री हळदीचे दूध देखील पिऊ शकता.

नारळ

हिवाळ्याच्या काळात तुम्ही तुमच्या जेवणात खोबरेल तेलाचा वापर करू शकता आणि त्यासोबत तुम्ही तुमच्या शरीरावर खोबरेल तेल लावू शकता आणि मसाज करू शकता. खोबरेल तेलाचे अनेक फायदे आहेत.

देशी तूप

पोषक आणि आरोग्यदायी स्निग्धांशाने समृद्ध असलेले देशी तूप आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. वजन वाढेल या भीतीने लोक देशी तूपाचे सेवन करत नाहीत पण हे खरे नाही. जर तुम्ही देशी तुपाचे सेवन मर्यादेत केले तर ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. तुपामध्ये प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि ओमेगा फॅटी अ‍ॅसिड्स चांगल्या प्रमाणात असतात.

Ahmednagarlive24 Office