Marathi News : आधार कार्ड हे असं एक डॉक्युमेंट आहे जे अत्यंत महत्वपूर्व आहे. परंतु आता हेच आधार कार्ड अनेकांची डोकेदुखी ठरू राहील आहे. याचे कारण असे की सायबर क्राईम करणारे लोक तुमच्या आधारचे बायोमेट्रिक माहिती चोरून तुमच्या अकाऊंटवरून थेट पैसे काढू शकतात.
विशेष म्हणजे हे करताना त्यांना तुमच्या मोबाईलची गरज नाही की कसल्या ओटीपीची गरज नाही. त्यामुळे तुमच्या नकळत तुमचं अकाउंट तुमच्या बायोमेट्रिक माहितीद्वारे खाली होऊ शकत.
आता हे वाचून तुम्ही नक्कीच शॉक झाले असाल. पण याला फक्त एकच पर्याय आहे. तो म्हणजे तुम्ही आधार बायोमेट्रिक लॉक करणे. आता हे लॉक कसे करावे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला तर मग जाणून घेऊयात याविषयी सविस्तर माहिती –
* अशा पद्धतीने करा आधार बायोमेट्रिक लॉक
सर्व प्रथम तुम्ही अधिकृत UIDAI या वेबसाइटवर जा. तेथे आधार नम्बर टाकून लॉगिन करा. जो मोबाईल नम्बर आधार कार्डशी लिंक केलेला असेल त्या नंबरवर OTP येईल. हा OTP टाकला की जाहले तुमचे लॉगिन. आता तुम्हाला येथे लॉक/अनलॉक बायोमेट्रिक हा पर्याय निवडून बायोमेट्रिक माहिती लॉक करावी लागेल.
* बायोमेट्रिक माहितीद्वारे फसवणूक नेमकी कशी होतेय ?
आता तुम्ही म्हणाल की आधार कार्ड तर आमच्याजवळ आहे मग अकाऊंटमधून पैसे कसे काढले जातात. ते हे लोक तुमचे बायोमेट्रिक माहिती घेऊन थेट खात्यातून पैसे गुल करतात. यासाठी, तुमच्या खात्याशी लिंक केलेल्या फोन नंबरवर कोणताही OTP किंवा रिक्वेस्ट देखील येत नाही.
हे चोर तुमच्या संमतीशिवाय तुमचे बँक खाते तुमचे बायोमेट्रिक्स वापरून रिकामे करू शकतात. तुम्हाला धक्का बसेल पण असे अनेक प्रकरणे समोर आली आहेत. याबाबत सायबर गुन्ह्याखाली अनेक तक्रारीही दाखल झाल्या आहेत. अनेकांचे खाते देखील खाली झाले आहेत.
यासाठी तुम्हाला सुरक्षित राहायचे असेल तर UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन वर दिलेली माहिती फॉलो करून बायोमेट्रिक माहिती लॉक करावी लागेल. असे केल्याने फसवणुकीपासून तुम्ही वाचाल.