File Photo

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी पारनेर तालुक्यातील अवैध धंद्यावर छापे टाकली.

या छाप्यामध्ये ५१ हजार ५०० रुपये किमतीची अवैध गावठी हातभट्टीची साधने व तयार दारुचा साठा जप्त करुन, दोघा जणांना पकडण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी कि, नगर जिल्हयातील अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी आदेश दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे स्वंतत्र तपास पथकांनी पारनेर तालुक्यामध्ये कारवाईची विशेष मोहिम राबवून २ ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्यामध्ये ५१ हजार ५०० रु. कि. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन व गावठी हातभटटीची दारु जप्त केली आहे.

या कारवाईत दोन आरोपींविरुध्द पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.