file photo

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने सोमवार, दि. ४ ऑक्टोबरपासून १३ ऑक्टोबरपर्यंत तिसगाव येथील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील ६१ गावांमध्ये लॉकडाऊन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असून, यामध्ये पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे दि.४ ऑक्टोबरपासून लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील इतर मोठ्या गावांत आठवडे बाजार अद्यापही सुरू झालेले नाहीत.

मात्र, तिसगाव येथे गेल्या काही दिवसांपासून आठवडे बाजारदेखील अनधिकृतपणे सुरू झाला होता. तिसगाव येथे सुरू करण्यात आलेल्या कोवीड सेंटरमध्ये दहाहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच तिसगावसह परिसरातदेखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.