मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज मुंबईच्या (Mumbai) बीकेसी मैदानावर विराट सभा पार पडणार आहे. तत्पूर्वी शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक सूचक ट्विट (Tweet) केले आहे.

संजय राऊत यांचे ट्विट

लगता है फिरसे उतरना पडेगा मैदान में दुबारा, कूछ लोग भूल गये है.. अंदाज हमारा!!! जय महाराष्ट्र! आज क्रांतिकारी दिवस!!, असे ट्विट राऊत यांनी केले आहे.

मुंबईच्या बीकेसी मैदानावर आज शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार असून या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेले आहे.

या आधी शिवसेनेने तीन टीझर लॉन्च (Teaser launch) करून उद्धव ठाकरे यांची सभा विराट होणार असल्याचे संकेत दिले आहेत. तसेच आम्हाला गर्दी जमवावी लागत नाही. शिवसेना आणि गर्दीचं अतूट नातं आहे, असेही राऊत यांनी सांगितले आहे.

दरम्यान, हिंदी भाषेवरून संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनाही आव्हान दिले असून मी आणि माझा पक्ष हिंदी भाषेचा सन्मान करतो. संसदेत मी हिंदीतच बोलतो. कारण देशाने माझं म्हणणं ऐकावं.

हिंदी ही देशाची भाषा आहे. त्यामुळे या भाषेचा सन्मान व्हावा. एक देश, एक संविधान आणि एक भाषा याचं आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वीकारलं पाहिजे, असे आवाहनच राऊत यांनी केले आहे.