Big change in domestic gas prices see new prices
Big change in domestic gas prices see new prices

LPG Cylinder : देशात महागाई (inflation) वाढतच चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. पेट्रोल, डिझेल (Petrol-Diesel) आणि घरगुती गॅसच्या (Domestic gas) किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोक कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसे वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.

आजकाल प्रत्येक जण एलपीजी गॅस वापरत आहे. सुरुवातीला सरकारकडून कुटुंबांना गॅस सिलिंडर मोफत दिले जात असले तरी त्यानंतर सिलिंडर भरण्यासाठी पैसे मोजावे लागतात. पेट्रोलियम कंपनीने (Petroleum Company) एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. यासोबतच कोरोनाच्या काळात सरकारकडून देण्यात येणारे अनुदानही बंद करण्यात आले आहे.

सबसिडी सुरू होऊ शकते

एका मीडिया रिपोर्टनुसार, सरकारने सिलिंडरवरील सबसिडी (subsidy) पुन्हा सुरू करण्याची योजना आखली आहे. या संदर्भात, अर्थ मंत्रालयाला सबसिडी पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे,

ज्यामध्ये झारखंड, मध्य प्रदेश आणि ईशान्य राज्यांमध्ये एलपीजीवर सबसिडी दिली जात आहे. त्यामुळे लवकरच देशातील इतर राज्यांमध्येही ते सुरू करण्यात येणार आहे.

त्यानुसार या प्रस्तावाला अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिल्यास सरकार पेट्रोलियम कंपनीच्या डीलरला ₹३०३ ची सबसिडी देईल आणि एलपीजी सिलिंडरवरही तेवढीच सूट मिळेल. त्यानुसार ग्राहक जो गॅस सिलिंडर घेणार आहे, त्यासाठी ९०० नाही तर ५८७ रुपये मोजावे लागतील.

एलपीजी कनेक्शनला आधार लिंक करा

सबसिडीसाठी तुम्हाला फक्त तुमचे LPG कनेक्शन तुमच्या आधार कार्डशी लिंक करायचे आहे. तुम्ही तुमचे एलपीजी कनेक्शन आधारशी लिंक केले नसेल, तर ते लवकर पूर्ण करा आणि सबसिडीचा लाभ घेणे सुरू करा.