file photo

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :-  मागील काही दिवसांपासून देशात कोरोनाच्या तिसरी लाट उसळली असून यात मोठ्या संख्येने राजकीय नेते बाधित होत आहेत.

यात नगर जिल्ह्यातील जवळपास सर्वच दिग्गज नेते मंडळी बाधित झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थकांनी देवाला साकडे घातले, कोणी महाआरती केली आहे.

यात खासदार डॉ. सुजय विखे यांच्या कुटुंबातील सदस्य देखील बाधित आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी कर्जतमध्ये भाजपच्यावतीने महाआरती करण्यात आली.

मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. त्यामुळे राज्यातील सर्वच निर्बंध शिथील करण्यात आले होते. मात्र आता परत एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे.

तज्ज्ञांच्या मते ही तिसरी लाट असून यात पूर्वीपेक्षा अत्यंत वेगाने कोरोनाचा प्रसार होत आहे. यात राजकीय नेते मंडळी अधिक आहेत.

दरम्यान खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आ.राधाकृष्ण विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील या सर्व मान्यवरांना एकाच दिवशी कोरोनाची लागण झाली आहे.

या सर्व मान्यवरांची प्रकृती, आरोग्य, उत्तम लाभावे व कोरोनातून लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होण्यासाठी कर्जतचे ग्रामदैवत संत सद्गगुरु श्रीग़ोदड महाराज मंदिरामध्ये भारतीय जनता पार्टी कर्जत यांच्या वतीने महाआरती करण्यात आली.