इतिहास जिवंत ठेवणारा ‘शाहीर’ महाराष्ट्राने गमावला -आ.विखे पाटील

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :- शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनान महाराष्‍ट्राचा इतिहास जिवंत ठेवणारे ‘शाहीर’ काळाच्या पडद्याआड गेले असल्याची भावना आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

आपल्या शोकसंदेशात आ.विखे पाटील म्हणाले की, छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि त्याचे संशोधन करण्यात पुरंदरेनी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले.

महाराष्ट्राचे वैभव असलेल्या गड किल्ल्यांचा इतिहास आपल्या ओजस्वी वाणीतून आणि सिध्दहस्त लेखणीतून समोर आणण्यासाठी बाबासाहेबांनी घेतलेले परीश्रम कोटयावधी शिवभक्तांमध्ये इतिहास जिवंत ठेवण्यासाठी कारणीभूत ठरले असल्याचे विखे पाटील म्हणाले.

जाणता राजा या महानाट्याच्या माध्यमातून केवळ आपल्या देशातच नाहीतर परदेशातही महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक ठेवा असंख्य पिढ्यांपर्यत पोहचविण्याच्या महत्वपूर्ण कामात त्यांनी अखेरपर्यत स्वतःला झोकून देताना शिवचरित्रातील संशोधन आणि अभ्यास करण्यात अखेरपर्यत त्यांनी ठेवलेले सातत्य त्यांच्या आयुष्याचा श्वास होता.

पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशा असंख्य पुरस्कारांनी बाबसाहेबांच्या कार्याचा गौरव झाला असला तरी, सामान्य माणसाच्या मनात शिवशाहीर म्हणून असलेली ओळख चिरतंनकाळ स्मरणात राहील.

तब्येत बरी नसतानाही प्रवरा परीसराला भेट देवून इथल्या कामाच्‍या केलेल्‍या पाहाणीची आठवण सांगून आ.विखे पाटील यांनी पुरंदरेंना श्रध्‍दांजली अर्पण केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!