file photo

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :-  देशात मागील काही दिवसांपासून केरळ येथील नव्या बाधितांची संख्या घटत असल्याने थोडा दिलासा असला तरी देशातील एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण अद्यापही केरळ येथेच आढळत आहेत.

देशातील एकूण सक्रिय बाधितांपैकी 52 टक्के सक्रिय बाधित रुग्ण एकट्या केरळ राज्यातील असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे देण्यात आली.

‘केरळ येथे सर्वाधिक सक्रिय बाधित असून त्यांची संख्या 1,44,000 इतकी आहे. तर त्यापाठोपाठ महाराष्ट्र राज्यात 40,000, तामिळनाडू येथे 17,000, मिझोराम येथे 16,800,

कर्नाटकात 12,000 तर आंध्र प्रदेशात 11,000 हुन अधिक सक्रिय बाधित आहेत.’ अशी माहिती भूषण यांनी दिली. देशात दररोज करण्यात येणाऱ्या करोना चाचण्यांमध्ये घट करण्यात आली नसून

दररोज 15 ते 16 लाख करोना चाचण्या करण्यात येत आहेत. तर दिलासादायकबाब म्हणजे देशामध्ये नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येकडे लक्ष वेधताना भूषण यांनी देशातील बरे होण्याचा दर वाढून 98 टक्के झाला असल्याचं सांगितलं.