अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- पश्चिमी वाऱ्याच्या प्रभावामुळे गुरुवार (दि. ९)नंतर पुन्हा वातावरणात बदल घडून येण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तविला आहे.
विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण, थंडी, धुके, पाऊस आणि दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आदी राज्यांसह महाराष्ट्रात देखील गारपिटीसह विजा पडणे आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पुढील तीन महिन्यांत देखील महाराष्ट्रातील अनेक भागांना कमी-अधिक प्रमाणात गारपिटीचा व पावसाचा फटका बसण्याची शक्यता असून,
पश्चिम महाराष्ट्रात गारपिटीचं प्रमाण जास्त असण्याच्या शक्यतेमुळे सतर्क राहण्याचे आवाहन देखील हवामानतज्ज्ञांनी केले आहे. सध्या महाराष्ट्रात दमट व काही भागात कोरडे वातावरण असून तापमान वाढलेले आहे.
पश्चिमी वारे अथवा पश्चिमी प्रक्षोभामुळे येणारा थंडावा आणि भौगोलिक प्रदेशानुसार असलेले बाष्प व तापमानातील चढ-उतार यांच्या प्रभावामुळे वातावरणात बदल होऊन डिसेंबरमध्ये पुन्हा पाऊस होऊ शकतो,
असे शास्त्रीय विश्लेषणही तज्ज्ञांनी केले आहे. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे पुन्हा पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी तयार पिके काढून घ्यावीत. काढलेली पिके झाकून ठेवावीत.
रासायनिक औषधांची फवारणी करू नये. गारांच्या तडाख्यातून आपल्या जनावरांचे रक्षण करण्यासाठी सुयोग्य उपाययोजना कराव्यात.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम