Maharashtra Weather:राज्यातील अनेक भागात उकाड्यामुळे जनता अक्षरशः हैराण झाली आहे. यामुळे सर्वत्र मान्सूनची (Mansoon 2022) मोठ्या आतुरतेने वाट बघितली जात आहे. विशेषता विदर्भमध्ये सूर्य देवाचा प्रकोप कायम आहे. विदर्भातील (Vidarbha) बहुतांशी ठिकाणी कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांची कोंडी होतं आहे.

आता नुकताच भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) एक अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागानुसार, अजून दोन दिवस तरी राज्यातील जनतेस उष्णतेपासून आराम मिळणार नसल्याचे चित्र आहे. यामुळे तूर्तास तरी राज्यातील जनतेस उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.

राज्यातील अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) इशारा हवामान विभागाने दिला असून या पार्श्वभूमीवर जनतेला सतर्क रहा म्हणुन सावध करण्यात आले आहे. सध्या राज्यातील (Maharashtra Weather) अनेक ठिकाणी जास्तीत जास्त तापमान 42 ते 45 अंशांच्या दरम्यान नोंदवले जात आहे. विदर्भ वगळता राज्यातील इतर भागात हवामान सामान्य असेल, मात्र उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा भारतीय हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.

मात्र भारतीय हवामान खात्यानुसार, 16 मे पासून वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होईल. अन एकदा की वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झालं की राज्यातील हवामान कमालीचे बदलेल आणि आकाशात ढगाची निर्मितीस सुरवात होईल. यामुळे 16 मे नंतर तापमानात मोठी घट घडून येणार असल्याचा दावा हवामान विभागाने केला आहे.

यामुळे निश्चितच 16 मे नंतर राज्यातील जनतेस उकाड्यापासून आराम मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांचा आजचा अर्थात 14 मे शनिवारचा हवामान अंदाज.

राजधानी मुंबईचा आजचा हवामान अंदाज: आज शनिवारी 14 मे रोजी राजधानी मुंबईत जास्तीत जास्त तापमान 35 आणि कमीत कमी तापमान 27 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने नुकताच वर्तवला आहे. यादरम्यान राजधानीमध्ये हवामान स्वच्छ राहणार आहे.

पुण्याचा आजचा हवामान अंदाज: आज पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर पुण्यात जास्तीत जास्त तापमान 38 तर कमीत कमी तापमान 25 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा भारतीय हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. यादरम्यान मात्र पुणे शहरात हलके ढगाळ वातावरण बघायला मिळणार असल्याचा अंदाज आहे.

नागपूरचा 14 मेचा हवामान अंदाज: आज 14 मे रोजी विदर्भातील प्रमुख शहर नागपुरात जास्तीत जास्त तापमान 43 अंश सेल्सिअस तर कमीत कमी तापमान 32 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुण्याप्रमाणेच आज नागपुरात देखील अंशतः ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज आहे.

नाशिकचा आजचा हवामान अंदाज: पश्चिम महाराष्ट्रातील नाशिकमध्ये आज 14 मे रोजी जास्तीत जास्त तापमान 38 अंश सेल्सिअस आणि कमीत कमी तापमान 24 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. आज नाशिक मध्ये सकाळी हवामान निरभ्र असेल, मात्र दुपारनंतर नाशिक मध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

औरंगाबादचा आजचा हवामान अंदाज: मराठवाड्यातील प्रमुख शहर औरंगाबादमध्ये आज 14 मे शनिवारी जास्तीत जास्त तापमान 41 अंश सेल्सिअस राहणार असून कमीत कमी तापमान 25 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा भारतीय हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. मुंबईप्रमाणेच आज औरंगाबादमध्ये देखील हवामान स्वच्छ राहणार असल्याचा अंदाज आहे.