रोहित पवारांचे आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवत भर पावसात भाषण !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी भर पावसात केलेल्या भाषणाने संपूर्ण महाराष्ट्राची मने जिंकली आहेत. वयाच्या 80 व्या वर्षी कसलीच तमा न बाळगता त्यांनी केलेल्या भाषणाची राज्यभरात चर्चा होत आहे. ही बातमी ताजी असतानाच आता त्यांचे नातू रोहित पवार यांचीही अशीच बातमी समोर आली आहे.

रोहित पवारांचे भाषण सुरू असतानाही जोरदार पाऊस सुरू झाला. यावेळी पावसामुळे ते थांबले नाही. त्यांनी भर पावसामध्ये भाषण तसेच सुरू ठेवले. रोहित पवार हे शरद पवारांच्या पावलावर पाऊल टाकताना दिसत आहेत.

शरद पवारांसोबतच रोहित पवार यांच्या या भाषणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सगळ्यांनी एकत्र या, मतदान करा. आपल्या विचारांचा उमेदवार निवडून कसा येईल हे सांगण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल अशी मला खात्री आहे असं रोहित पवार त्यांच्या भाषणात म्हणाले. तसेच यंदा 90 टक्के मतदान हे राष्ट्रवादीला करा असेही ते या भाषणामध्ये सांगत आहेत.

साताऱ्यात शुक्रवारी शरद पवारांची सभा होती. दरम्यान जोरदार पाऊस सुरू झाला. मात्र शरद पवारांनी पावसाची तमान न बाळगता बरसायला सुरूवात केली. पावसात भिजत शरद पवाराचे सुरू असलेले पाहून कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला. वरुणराजा आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आला आहे. आता महाराष्ट्रात परिवर्तन नक्की घडेल असं शरद पवार म्हणाले.

तसंच कोणतीही चूक हातून झाली तर ती मान्य करायची असते. लोकसभेच्या वेळी साताऱ्यात मी चूक केली आता मी ही चूक सुधारणार आहे. उदयनराजेंना तिकीट देऊन चूक केल्याचे ते म्हणाले. आता श्रीनिवास पाटील यांना विजयी करा असं आवाहनही शरद पवार यांनी केलं.

शरद पवार यांनी पावसात भाषण केल्याने त्यांनी भाजपा आणि शिवसेना त्यांचा प्रचार फिका पडला असल्याच्याच चर्चा सुरू आहे. रात्रीपासूनच या भाषणाचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. संपूर्ण सोशल मीडिया हा शरद पवारांच्या भाषणाच्या व्हिडिओ फोटोंनी भरलेला आहे.

दरम्यान रोहित पवार यांचाही पावसात भिजतानाचा व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. रोहित पवार यांनीही आजोबा शरद पवार यांच्याकडून राजकारणाचे धडे गिरवले आहेत. पाऊस आला तरीही न थांबता ते भाषण करत राहिले आणि विरोधकांवर बरसले तसेच त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करा असेही आवाहन केले.

अहमदनगर लाईव्ह 24