मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात हा नेता लढविणार निवडणूक !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नागपूर : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काँग्रसेचे आशीष देशमुख लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसच्या उमेदवारांची चौथी यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली.

यामध्ये ही घोषणा करण्यात आली. या यादीत १९ उमेदवारांचा समावेश असून, काँग्रेसने आतापर्यंत १४० उमेदवार जाहीर केले आहेत. चौथी यादी जाहीर करतानाच काँग्रेसने सिल्लोड आणि नंदुरबारमधले उमेदवारदेखील बदललेले आहेत. वर्सोवा येथून बलदेव खोसा यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

काँग्रेसचे चौथ्या यादीतील उमेदवार पुढीलप्रमाणे : उदयसिंग पाडवी (नंदुरबार), डी. एस. अहिरे (साक्री), साजिद खान (अकोला पश्चिम), सुलभा खोडके (अमरावती), बलवंत वानखेडे (दर्यापूर), आशीष देशमुख (नागपूर दक्षिण ­पश्चिम), सुरेश भोयर (कामठी), उदयसिंग यादव (रामटेक), अमर वरदे (गोंदिया), महेश मेंढे (चंद्रपूर), माधवराव पवार (हदगाव), खैसार आझाद (सिल्लोड), विक्रांत चव्हाण (ओवळा माजिवाडा), हिरालाल भोईर (कोपरी­ पाचपाखाडी), बलदेव खोसा (वर्सोवा), आनंद शुक्ला (घाटकोपर पश्चिम), लहू कानडे (श्रीरामपूर), सुशील राणे (कणकवली), राजू आवळे (हातकणंगले)


अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24