यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १० कोटी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई, दि.16 कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत आहे.  या जागतिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपले योगदान म्हणून सर्व विद्यापीठांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करावी असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले होते.

याला सकारात्मक प्रतिसाद देत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून 10 कोटी रुपयांचा निधी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी देण्याचे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

तसेच उर्वरित विद्यापीठांकडून देखील ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी मदत म्हणून जाहीर केली जाईल असा विश्वास श्री. सामंत यांनी व्यक्त केला.

अहमदनगर लाईव्ह 24