महाराष्ट्र

10 तासाचा प्रवास फक्त 4 तासात ! कल्याण ते लातूर 445 किलोमीटर लांबीचा नवीन महामार्ग, माळशेज घाटात तयार होणार 8 KM चा बोगदा, पहा संपूर्ण रूटमॅप

Published by
Ahmednagarlive24 Office

Kalyan-Latur Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत व्हावी यासाठी विविध महामार्गाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. अजूनही काही महामार्गांची कामे महाराष्ट्रात सुरूच आहेत. यामध्ये समृद्धी महामार्गाचा देखील समावेश होतो.

दरम्यान समृद्धी महामार्गाबाबत नुकतीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा लवकर सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे. सध्या स्थितीला 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचा सहाशे किलोमीटरचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू आहे.

नागपूर ते भरविर हा समृद्धी महामार्ग सुरू असून आता भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटरचा टप्पा पूर्णपणे बांधून रेडी झाला असून लवकरच याचे लोकार्पण होणार आहे. यामुळे आता नागपूर ते इगतपुरी पर्यंतच्या समृद्धी महामार्गाचा बेनिफिट प्रवाशांना मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास जलद आणि सुरक्षित होईल अशी आशा व्यक्त होत आहे.

अशातच मात्र महाराष्ट्रात आणखी एक नवीन महामार्ग तयार होणार अशी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून कल्याण ते लातूर दरम्यान 445 किलोमीटर लांबीचा नवीन महामार्ग तयार केला जाणार आहे.

राज्य रस्ते विकास महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकसत्ता या प्रतिष्ठित वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, सध्या कल्याण ते लातूर हा प्रवास पूर्ण करण्यासाठी प्रवाशांना दहा तासांचा कालावधी खर्च करावा लागत आहे. दरम्यान हीच गोष्ट लक्षात घेऊन राज्यस्त विकास महामंडळाच्या माध्यमातून या दोन्ही शहरांना कनेक्ट करण्यासाठी नवीन महामार्ग तयार केला जाणार आहे.

हा द्रुतगती महामार्ग कल्याण येथून सुरू होऊन माळशेज घाटातून पुढे अहमदनगरला जाईल आणि मग पुढे बीड, मांजरसूंबा, अंबेजोगाईवरून लातूर शहर आणि तेथून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत संपणार असा दावा करण्यात आला आहे. दरम्यान या महामार्ग अंतर्गत माळशेज घाटात आठ किलोमीटरचा बोगदा विकसित केला जाणार आहे.

विशेष म्हणजे हा प्रस्तावित करण्यात आलेला महामार्ग विरार ते अलिबाग बहुउद्देशीय मार्गीकेसोबतही कनेक्ट केला जाणार आहे. यासाठी जवळपास 50 हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. विशेष म्हणजे हा मार्ग बांधून झाल्यानंतर कल्याण ते लातूर हा दहा तासांचा प्रवास फक्त चार तासात पूर्ण होईल अशी आशा व्यक्त होत आहे.

दरम्यान याबाबतचा प्रस्ताव राज्य रस्ते विकास महामंडळाने तयार केला असून या प्रस्तावाला आता राज्य शासनाची मंजुरी अपेक्षित आहे. दरम्यान या प्रस्तावाला राज्य शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर राज्य रस्ते विकास महामंडळाकडून याचा आराखडा तयार होणार आहे.

Ahmednagarlive24 Office